हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत द्या
By Admin | Updated: November 22, 2014 23:06 IST2014-11-22T23:06:17+5:302014-11-22T23:06:17+5:30
विदर्भातील शेतीची यंदाची स्थिती बिकट झाली असून शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. ती सोडवण्याकरिता शासनाने जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये मदत

हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत द्या
मुख्यमंत्र्यांना निवेदन : किसान अधिकार अभियानची मागणी
वर्धा : विदर्भातील शेतीची यंदाची स्थिती बिकट झाली असून शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. ती सोडवण्याकरिता शासनाने जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये मदत देण्याची मागणी किसान अधिकार अभियानच्यावतीने मुख्यमंत्री व वित्तमंत्री यांना निवेदनाद्वारे केली आहे. सदर निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांना सोपविले आहे.
जिल्ह्यात खरीपाच्या सुरुवातीलाच पावसाच्या विलंबामुळे दुबार-तिबार पेरणीने आधिच त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना सोयाबीनची नापिकी, कपाशीवरील लाल्या व बाजारात कापूस सोयाबीनला मिळणारा अत्यल्प भाव यामुळे त्यांची आर्थिक स्थिती खालावली आहे.
वर्तमान शासनाने निवडणुकांच्या काळात केलेल्या घोषणांप्रमाणे ५० टक्के नफा धरून शेतमालाच्या उत्पादन खर्चावर आधारित भाव जाहीर करावे. डॉ. स्वामीनाथन व डॉ. नरेंद्र जाधव समितीने दिलेल्या सुचनांचा तत्काळ अवलंब करावा. शेतकऱ्यांच्या शेतात रोजगार हमी योजनेंतर्गत कामे करण्याची सवलत द्यावी व हेक्टरी २५ हजार रुपये दुष्काळ प्रवण क्षेत्रातील शेतकऱ्यांना शिवाय पैसेवारी ५० च्या आत आलेल्या तालुक्यातील गावांना सरसकट मदत द्यावी अशी मागणी किसान अधिकार अभियानच्यावतीने मुख्यमंत्र्यांना निवेदनातून करण्यात आली आहे.(प्रतिनिधी)