हेल्मेटमुळे वाचले दोघांचे प्राण  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 04:28 IST2018-05-07T04:28:42+5:302018-05-07T04:28:42+5:30

दोन दुचाकीमध्ये झालेल्या धडकेत हेल्मेटमुळे दोन युवकांचे प्राण वाचल्याची घटना पिपरी (मेघे) भागातील पोलीस वसाहतीसमोर घडली.

 Helmets News | हेल्मेटमुळे वाचले दोघांचे प्राण  

हेल्मेटमुळे वाचले दोघांचे प्राण  

वर्धा  - दोन दुचाकीमध्ये झालेल्या धडकेत हेल्मेटमुळे दोन युवकांचे प्राण वाचल्याची घटना पिपरी (मेघे) भागातील पोलीस वसाहतीसमोर घडली. दोन दुचाकी समोरासमोर धडकल्याने अमोल महादेव लिडबे (२४) रा. बुट्टीबोरी जि. नागपूर व राजेंद्र नामदेव घुमे (२६) रा. येळाकेळी हे दोघे जखमी झाले. त्यांनी दुचाकीने प्रवास करताना हेल्मेट घातले असल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली नाही. वर्धा जिल्ह्यात प्रत्येक दुचाकी चालकाला हेल्मेटचा वापर क्रमप्राप्त केल्यापासून हेल्मेटच्या वापरामुळे चार जणांचे जीव वाचले असल्याचे वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुरव यांनी सांगितले.

Web Title:  Helmets News