लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : बसस्थानकाकडून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकाच्या दिशेने जात असलेली कार अनियंत्रित होत न्यायालयाच्या भिंतीवर चढली. या अपघातात दोन जण जखमी झाले. शिवाय खुर्ची, टेबलचा चुराडा झाला. वेळीच वाहनाला बंद करण्यात चालकाला यश आल्याने पुढील अनर्थ टळला. ही घटना मंगळवारी रात्री ९.४० वाजताच्या सुमारास घडली.प्राप्त माहितीनुसार, एम.एच.३२ ए.एच. ३४७६ क्रमांकाची कार शिवाजी चौकाच्या दिशेने जात होती. वाहन न्यायालयासमोर आले असता वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. अशातच वाहनाने न्यायालयाच्या भिंतीला धडक दिली. यात न्यायालयाची भिंत तुटली असून त्याच परिसरात असलेल्या खुर्ची, टेबल आदी साहित्याचा चुराडा झाला. तर हातगाडीवर खाद्यपदार्थ विक्री करणारा सचिन बारापात्रे व महेश रेवतकर हे जखमी झाले. अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत जखमीला रुग्णालयाकडे रवाना केले. घटनेच्यावेळी सदर कार सागर ठाकूर नामक व्यक्ती चालवित होता, असे काही प्रत्यक्षदर्शीयांनी सांगितले. या घटनेमुळे न्यायालय प्रशासनाचे सुमारे दहा हजारांचे तर साहित्याचा चुराडा झाल्याचे खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्यांचे २० हजारांचे नुकसान झाले आहे.या घटनेची नोंद आर्वी पोलिसांनी घेतली असून पुढील तपास सुरू आहे.
भरधाव कार चढली न्यायालयाच्या भिंतीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 05:00 IST
प्राप्त माहितीनुसार, एम.एच.३२ ए.एच. ३४७६ क्रमांकाची कार शिवाजी चौकाच्या दिशेने जात होती. वाहन न्यायालयासमोर आले असता वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. अशातच वाहनाने न्यायालयाच्या भिंतीला धडक दिली. यात न्यायालयाची भिंत तुटली असून त्याच परिसरात असलेल्या खुर्ची, टेबल आदी साहित्याचा चुराडा झाला. तर हातगाडीवर खाद्यपदार्थ विक्री करणारा सचिन बारापात्रे व महेश रेवतकर हे जखमी झाले.
भरधाव कार चढली न्यायालयाच्या भिंतीवर
ठळक मुद्देदोघे जखमी : वाहन वेळीच थांबल्याने पुढील अनर्थ टळला