लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : 'लाँग क्यूटी सिंड्रोम' हा आनुवांशिक आजार असून, यावर वेळीच औषधोपचार न केल्यास संबंधित रुग्णाला मोठा धोका होण्याची शक्यता असते. हा आजार जीवघेणाही ठरु शकतो. त्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्याने वेळीच चाचणी, निदान व पूर्ण औषधोपचार करणे फायद्याचे ठरू शकते. 'लॉग क्यूटी सिंड्रोम' हा आनुवांशिक आजार असला तरीही तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय कुठलीही औषधी आणि उपचार घेणे अपायकारक ठरू शकतात.
ही आहेत या आजाराची लक्षणे, वेळीत काळजी घ्या'लाँग क्यूटी सिंड्रोम'ची सर्वात सामान्य लक्षण म्हणजे बेशुद्ध होणे, ज्याला सिंकोप देखील म्हणतात. एलक्युटीएसमुळे बेशुद्ध होणे अगदी कमी किंवा कोणत्याही चेतावणीशिवाय होऊ शकते. जेव्हा हृदयाचे ठोके थोड्या काळासाठी अनियमित होतात, तेव्हा बेशुद्धी येते. संबंधित रुग्ण उत्साहित असताना, रागावलेले असताना, घाबरलेले असताना किंवा व्यायामादरम्यानही बेशुद्ध होऊ शकतात. बेहोश होण्यापूर्वी 'लाँग क्यूटी सिंड्रोम' असणाऱ्या काही लोकांना, अशी लक्षणे दिसू शेतात. धूसर दृष्टी, हलकेपणा, धडधडणारे हृदयाचे ठोके ज्याला धडधडणे म्हणतात. व अशक्तपणा आदी लक्षणे जाणवतात.
तरुणाचाही अचानक होतो रुग्णाचा मृत्यूनिरोगी दिसणाऱ्या तरुणामध्ये अचानक हृदयविकाराच्या मृत्यूशी 'लाँग क्यूटी सिंड्रोम'चा संबंध जोडला गेला आहे. मुलांमध्ये आणि तरुण प्रौढांमध्ये काही अस्पष्ट घटनांसाठी या आजाराचा संबंध जोडला जातो.
आजाराचे दोन प्रकार...
- 'लाँग क्यूटी सिंड्रोम' सहसा दोन गटांमध्ये मोडतो. जन्मजात लाँग क्युटी सिड्रो, तुम्ही या प्रकारच्या एलक्यूटीएससह जन्माला आला आहात. हा आजार कुटुंबामधून होणाऱ्या डीएनएमधील बदलामुळे होतो. याचाच अर्थ तो वारशाने मिळतो.
- अॅक्वायर्ड लाँग क्यूटी सिड्रोम या प्रकारचा एलक्यूटीएस दुसऱ्या आरोग्य स्थितीमुळे किंवा औषधांमुळे होतो. विशिष्ट कारण शोधून त्यावर उपचार केल्यास ते सहसा उलट करता येतो. 'लाँग क्यूटी सिंड्रोम'सहसा दोन गटात मोडत असून या आजाराच्या रुग्णांवर वर्ध्यासह नागपूर येथील हृदयरोग तज्ज्ञांकडून प्रभावी औषधोपचार केला जातो.
अचानक हृदय बंद पडते अन् झोपेतच जातो जीव'लाँग क्यूटी सिंड्रोम' आजार असलेल्या रुग्णांचे पम्पिंग योग्यरित्या होत नाही. परिणामी हृदय बंद पडते आणि झोपेतच संबंधित रुग्णाचा जीव जाण्याची शक्यता असते.
झोपेमध्ये हृदयाचे ठोके होतात कमी-जास्त'लाँग क्यूटी सिंड्रोम' या आजारामध्ये झोपेत हृदयाचे ठोके कमी-जास्त होत असतात. त्यामुळे अशा रुग्णांची कुटुंबीयांनी पूर्ण काळजी घेणे आवश्यक आहे.
"अलीकडे हृदयविकारामध्ये वेगवेगळी लक्षणे दिसून येतात. हृदयाचे पम्पिंग योग्यरित्या न होणे, छातीत अधिक धडधडणे आदी लक्षणे आढळतातच तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. 'लाँग क्यूटी सिंड्रोम'हा आनुवांशिक आजार असू शकतो. त्यामुळे चाचण्या करणे गरजेचे आहे."- डॉ. अंकुश कावलकर, वैद्यकीय तज्ज्ञ, वर्धा.