वाहनांच्या धुरामुळे आरोग्य धोक्यात
By Admin | Updated: June 9, 2014 23:47 IST2014-06-09T23:47:06+5:302014-06-09T23:47:06+5:30
वाहनांमध्ये होणार्या रॉकेलच्या सर्रास वापरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. रॉकेलच्या धुरामुळे नागरिकांना विविध आजार होण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. शहरालगतच्या ग्रामीण भागातून

वाहनांच्या धुरामुळे आरोग्य धोक्यात
वर्धा : वाहनांमध्ये होणार्या रॉकेलच्या सर्रास वापरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. रॉकेलच्या धुरामुळे नागरिकांना विविध आजार होण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. शहरालगतच्या ग्रामीण भागातून शहराकडे प्रवासी वाहतूक करणार्या ऑटोत रॉकेचा सर्रास वापर होत असल्याचे अनेकवेळा समोर आले आहे.
ग्रामीण व शहरी भागातील ऑटो चालक खेड्यातील विक्रेत्यांकडून जादा पैसे देऊन रॉकेलची खरेदी करतात. हे रॉकेल इंधन म्हणून ऑटोत वारण्यात येते. या रॉकेलमुळे वाहनातून मोठय़ा प्रमाणात धूर निघतो. या धुरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. डिझेलच्या किमती दिवसेंदिवस वाढत असल्याने आता विविध वाहनांमध्ये इंधन म्हणून मोठय़ा प्रमाणावर रॉकेलचा वापर होत आहे. ट्रक आणि ऑटो त्यात आघाडीवर आहेत.
ग्रामीण भागात केरोसिन विक्रेते सामान्य जनतेला रॉकेल नाही म्हणून सांगतात अन् त्यांच्या वाट्याचे रॉकेल वाहनधारकांना विकतात.
वाहनांतून निघणार्या रॉकेलच्या धुरामुळे नागरिकांना दमा व श्वसनाच्या आजारांनी ग्रासले आहे. डिझेलचे दर वाढल्याने ऑटो चालकांनी रॉकेलकडे धाव घेतली आहे. कमी पैशात जादा उत्पन्न होत असल्याने ऑटो चालक रॉकेल विक्रेत्यांकडे वळत आहे. रॉकेल विक्रेते ग्राहकांना रॉकेल उपलब्ध नसल्याचे कारण सांगून ऑटो चालकांना मात्र जादा पैशात रॉकेल उपलब्ध करून देत आहेत. त्यामुळे नागरिकांना हक्काचे रॉकेलसुद्धा मिळणे दुरापास्त झाले आहे.
ग्रामीण भागात तर ट्रॅक्टरमध्येही सर्रास रॉकेलचा मोठय़ा प्रमाणात वापर केला जातो. रॉकेल विक्रेत्यांची कुणी तक्रार करत नसल्यामुळे त्यांचे चांगलेच फावत आहे. जादा दराने रॉकेल विकून ते आपली पोळी शेकून घेत आहेत. मात्र गरिबांना रॉकेल मिळणे कठीण झाले आहे. त्यांना महिनाभराचा कोटाही पूर्णपणे मिळतो की नाही, अशी शंका आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.(प्रतिनिधी)