७२ तासांत ८७,२१८ व्यक्तींची आरोग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 05:00 IST2020-04-26T05:00:00+5:302020-04-26T05:00:27+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्धा जिल्ह्यात गुरूवारपासून सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे. आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक तसेच आरोग्य सेविकांचा समावेश असलेले एकूण १ हजार १५० चमू तयार करून त्यांच्या मार्फत हे सर्वेक्षणाचे काम केले जात आहे. सर्वेक्षण करणाऱ्या चमूतील कोविड योद्धा प्रत्येक घरी जाणून कुटुंबातील कुठल्या व्यक्तीला ताप, सर्दी तसेच खोकला आहेत काय याची शहानिशा करीत आहेत.

Health check-up of 87,218 persons in 72 hours | ७२ तासांत ८७,२१८ व्यक्तींची आरोग्य तपासणी

७२ तासांत ८७,२१८ व्यक्तींची आरोग्य तपासणी

ठळक मुद्दे१,१५० चमू करतेय सर्वेक्षण । १,५०७ व्यक्तींमध्ये आढळले सर्दी, ताप, खोकल्याची सौम्य लक्षणे

महेश सायखेडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वर्धा जिल्ह्याच्या शेजारील नागपूर, अमरावती तसेच यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. शिवाय वर्धा जिल्ह्यात अद्यापही कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. परंतु, दक्षता म्हणून गुरूवारपासून आरोग्य विभागाकडून घरोघरी जाऊन सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे. मागील ७२ तासांच्या सर्वेक्षणात ८७ हजार २१८ व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात आली असून त्यापैकी १ हजार ५०७ व्यक्तींमध्ये सर्दी, ताप अन् खोकल्याची किरकोळ लक्षणे आढळली. या सर्व व्यक्तींवर औषधोपचार करण्यात आले असून सध्या ते ठणठणीत असल्याचे सांगण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्धा जिल्ह्यात गुरूवारपासून सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे. आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक तसेच आरोग्य सेविकांचा समावेश असलेले एकूण १ हजार १५० चमू तयार करून त्यांच्या मार्फत हे सर्वेक्षणाचे काम केले जात आहे. सर्वेक्षण करणाऱ्या चमूतील कोविड योद्धा प्रत्येक घरी जाणून कुटुंबातील कुठल्या व्यक्तीला ताप, सर्दी तसेच खोकला आहेत काय याची शहानिशा करीत आहेत. शनिवारी दुपारपर्यंत वर्धा जिल्ह्यातील या कोविड योद्धांनी ८७ हजार २१८ व्यक्तींची तपासणी केली. त्यापैकी १ हजार ५०७ व्यक्तींमध्ये ताप, सर्दी व खोकल्याची सौम्य लक्षणे आढळल्याची नोंद घेतली. या सर्व व्यक्तींवर नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांच्या माध्यमातून औषधोपचार करण्यात आला आहे. सध्या या व्यक्तींची प्रकृती स्थिर असल्याचेही सांगण्यात येते.

१४ लाख लोकांपर्यंत पोहोचणार कोविड योद्धा
आरोग्य विभागाचे कोविड योद्धांकडून सध्या सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. गावागावात तसेच घराघरात जाऊन कुणाला सर्दी, ताप व खोकल्याची लक्षणे आहेत काय याची माहिती त्यांच्याकडून घेतली जात आहे. वर्धा जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे १४ लाख असून प्रत्येक व्यक्तीची तपासणी या मोहिमेदरम्यान करण्यात येणार आहे.

६१ व्यक्तींना होता श्वास घेण्यास त्रास
लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी श्वास घेण्यास कुणाला त्रास आहे काय याची माहिती जाणून घेतली. या सुमारे एक महिन्यांच्या कालावधीतील सर्वेक्षणात ६१ व्यक्तींना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे पुढे आले. सदर व्यक्तींवर वैद्यकीय तज्ज्ञांकडून उपचार करून त्यांना ठणठणीत करण्यात आले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात गुरूवारपासून सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेवक, आरोग्य सेवक तसेच सेविकांच्या माध्यमातून हे सर्वेक्षण केले जात आहे. मागील ७२ तासांत ८७ हजार २१८ व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यापैकी १ हजार ५०७ व्यक्तींमध्ये ताप, सर्दी व खोकल्याची सौम्य लक्षणे आढळली. या व्यक्तींवर उपचार करून त्यांना ठणठणीत करण्यात आले आहे.
- डॉ. अजय डवले, जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.

Web Title: Health check-up of 87,218 persons in 72 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.