नवीन संच निर्धारणामुळे मुख्याध्यापक अडचणीत
By Admin | Updated: August 30, 2014 23:59 IST2014-08-30T23:59:47+5:302014-08-30T23:59:47+5:30
माध्यमिक शाळांच्या नवीन संच मान्यता २०१३-१४ नुसार सर्व शाळांतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त दर्शविण्यात आले़ यामुळे मुख्यध्यापकांना शाळा चालविणे कठीण झाले आहे़ शैक्षणिक,

नवीन संच निर्धारणामुळे मुख्याध्यापक अडचणीत
वर्धा : माध्यमिक शाळांच्या नवीन संच मान्यता २०१३-१४ नुसार सर्व शाळांतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त दर्शविण्यात आले़ यामुळे मुख्यध्यापकांना शाळा चालविणे कठीण झाले आहे़ शैक्षणिक, प्रशासनिक कामकाज, शाळेची देखभाल करणे मनुष्यबळ कमी असल्याने त्रासदायक ठरत आहे़ या प्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे़ याबाबत जिल्ह्यातील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर संघटनांनी याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी व शाळा प्रशासनास निवेदन सादर केले आहे़
निवेदनातन पूर्वी हायस्कूल विभाग इयत्ता आठवी ते दहावी होता; पण सध्या हायस्कूल विभाग इयत्ता ९ ते दहावीचे शिक्षक संख्या आलेली आहे़ यामुळे हायस्कूल विभागात पूर्वीचे इयत्ता आठवीचे शिक्षक अतिरिक्त ठरतात़ इयत्ता सहावी ते आठवीमध्ये पदवीधर शिक्षकांची गरज आहे़ हायस्कूलमधील कोणत्या शिक्षकाला इयत्ता ६ ते ८ साठी घ्यावे वा दाखवावे, याबात कोणतेच निकष नाही़ हायस्कूलमध्ये अतिरिक्त ठरलेले शिक्षक इयत्ता ६ ते ८ मध्ये समायोजित करण्याच्या तोंडी सूचना दिल्या जात आहेत; पण त्यांच्या सेवा ज्येष्ठता व अन्य सुविधांबाबत अनिश्चितता आहे़ बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार इयत्ता पाचवी आणि सहावी ते आठवीपर्यंत विद्यार्थी संख्येवर शिक्षक संख्या निर्धारण होते़ हे गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या दृष्टीने हिताचे नाही़ येथेही पूर्वीप्रमाणेच तुकडी मंजूर होणे गरजेचे आहे़ येथे किमान ३० वा ३५ पर्यंत एक शिक्षक, असे धोरण असले तरी वर्ग तुकड्या ठरवून शिक्षकांचे प्रमाण वाढविणे गरजेचे आहे़ शैक्षणिक प्रगतीच्या दृष्टीने इयत्ता ९ व १० वी साठी सरसकट प्रत्येक तुकडीला १़५ शिक्षक संख्या मंजूर करण्यात यावी़ जेणेकरून प्रत्येक विषयाला योग्य न्याय मिळेल व पटसंख्येच्या आधारावर शिक्षक संख्या न देता विषयानुसार शिक्षक संख्या मंजूर करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली़
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये २०० विद्यार्थी संख्येपर्यंत एकच शिपाई मंजूर आहे़ इयत्ता ५ ते १० पर्यंत वर्ग असणाऱ्या शाळेत किमान ३ शिपाई असणे गरजेचे आहे़ सध्या शाळांत शिपाई, प्रयोगशाळा परिचर, चौकीदार आदी पदे आहेत़ पूर्वी चार चतुर्थश्रेणी कर्मचारी होते, तेथे एक वा दोनच कर्मचारी मंजूर होत आहेत़ प्रयोगशाळा परिचर सेवाज्येष्ठ असला तरी त्यालाच शिपायाची कामे करावी लागतात; पण त्याने नाकारल्यास त्याच्यावर काय कारवाई करणार, हा प्रश्नच आहे़ या समस्यांवर उपाय सूचवावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली़(कार्यालय प्रतिनिधी)