बँकेच्या संगणकीय सेवा ग्राहकांना डोकेदुखी

By Admin | Updated: April 30, 2016 02:22 IST2016-04-30T02:22:57+5:302016-04-30T02:22:57+5:30

माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात ग्राहकांना जलद व उत्तम सेवा मिळावी यादृष्टीने बँक कार्यालयात अत्याधुनिक यंत्राचा वापर करण्यात येत आहे.

The headache of the bank's computing service customers | बँकेच्या संगणकीय सेवा ग्राहकांना डोकेदुखी

बँकेच्या संगणकीय सेवा ग्राहकांना डोकेदुखी

व्यवस्थापनाचे दुर्लक्ष : खातेदार ताटकळत
पुलगाव : माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात ग्राहकांना जलद व उत्तम सेवा मिळावी यादृष्टीने बँक कार्यालयात अत्याधुनिक यंत्राचा वापर करण्यात येत आहे. संगणक प्रणालीचा वापर करण्यात होत असला तरीही सततच्या तांत्रिक बिघाडामुळे ग्राहकांची कामे खोळंबतात. येथील एका राष्ट्रीयकृत बँकेतील साधनांना नादुरुस्तीक्चे ग्रहण लागले आहे. त्यामुळे कामे जलद होण्याऐवजी ग्राहकांची ताटकळ होत आहे.
ग्राहकांच्या वेळेची बचत करण्यासाठी येथे विविध उपकरणे उपलब्ध करून दिली आहे. मात्र या बँक शाखेतील अधिकाधिक साधने बंद आहे. अथवा नादुरुस्त असल्याने ती ग्राहकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. येथील भारतीय स्टेट बँकेची प्रशस्त इमारत सर्व सोयींनी परिपूर्ण आहे. येथे कर्मचाऱ्यांची वाणवा नाही. प्रत्येक विभागासाठी वेगवेगळ्या खिडक्या आहे. यामुळे येथील ग्राहक संख्या मोठी आहे. स्थानिक स्टेट बँक शाखेत एटीएम केंद्र, कॉईन मशिन, पासबुक प्रिटींग मशिन, राशी स्थानांतर मशीन यासारख्या अत्याधुनिक यंत्रसामुग्री उपलब्ध करुन दिल्या आहे. त्यामुळे ग्राहकांना रांगेत उभे न राहता व वेळेचा अपव्यय होऊ न देता कामे करता येतात. यामागील बँक प्रशासनाचा हेतू निश्चितच चांगला आहे. परंतु आवश्यक वेळी किंवा सणासुदीच्या दिवसात ही यंत्रे तासन्तास बंद असतात. त्यामुळे सेवा सुरू होण्यासाठी खातेधारकांना ताटकळत रांगेत उभे राहावे लागते. त्यामुळे या सेवेचा खातेधारकांना उपयोग होण्याऐवजी नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. या गलथान कारभारामुळे खातेधारकांत नाराजीचा सूर व्यक्त होत आहे. ग्राहकांच्या वेळेचा अपव्यय होवू नये, त्यांना आर्थिक व्यवहार त्वरीत करता यावे, याकरिता विविध राष्ट्रीयकृत बँकांनी शाखा कार्यालय, रेल्वेस्टेशन येथे एटीएम मशीन दिल्या आहे. पण एटीएमसेवा सुरळीत सुरू आहे किंवा नाही, त्यात रक्कम आहे काय हे पाहण्याची तसदी बँक अधिकारी घेत नसल्याचे दिसते. परिणामी ग्राहकांना केवळ मनस्ताप करुन तिथून परतावे लागते. स्थानिक स्टेट बँकेत लावलेली मशीन काढण्यात आली. त्याऐवजी अ‍ॅटोमॅटीक पासबुक नोंदी करण्याचे यंत्र लावण्यात अले. ही प्रिटींग मशीनही काही दिवसांपासून बंद असल्याने खातेधारकांना नोंदी करण्यासाठी रांगेत उभे राहावे लागले. याची दखल घेत यंत्रांच्या दुरुस्तीची मागणी आहे.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: The headache of the bank's computing service customers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.