शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
14
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
15
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
16
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
17
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
18
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
19
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

टिकटॉक बंद झाले त्या दिवशी ‘तो’ जेवला नाही... त्याला आहेत सव्वा दोन लाख फॉलोअर्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 4:19 PM

पहाटे तीन वाजता कामाला जायचे. तिकडून परत आला की दिवस भर तो व्हिडिओ बनवण्यात गुंग असायचा. दिवसाला कधी चार कधी पाच व्हिडिओ बनवायचा. टिकटॉक बंद झाले त्यादिवशी तो जेवला नाही.

ठळक मुद्देदहावी पास टिकटॉक स्टार सूरजला पर्याची अ‍ॅपची प्रतिक्षा१,६०० पेक्षा जास्त व्हिडीओ केले पोस्ट

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: दहावी पर्यंतचे शिक्षण घेतलेला सालोड येथील सूरज राऊत हा अवघ्या काही वर्षांच्या काळात टिक टॉकवर १ हजार ६०० पेक्षा जास्त व्हिडीओ पोस्ट करून तब्बल २.१५ लाख फॉलोअर्सचा चाहता झाला. पण सध्या टिक टॉक या चिनी अ‍ॅपवर केंद्र शासनाने प्रतिबंध घातल्याने या टिक टॉक स्टारला सध्या पर्यायी अ‍ॅपची प्रतीक्षा आहे.अवघ्या १५ सेकंदाचा व्हिडीओ तयार करून अनेकांना हसविण्याचे माध्यम तसेच अनेकांना आपले सुप्त गुण सादर करण्याचे चांगले व्यासपीठ टिकटॉक ठरू पाहत होते; पण सध्या या अ‍ॅपवर केंद्र शासनाने बंदी घातली आहे. वर्धा शहरानजीकच्या सालोड (हिरापूर) येथील सुरज राऊत हा सामान्य कुटुुंबातील. शिवाय त्याने केवळ दहावीपर्यंतचे शिक्षण घेतलेले. भाजी बाजारात श्रमाचे काम करून तो कुटुंबीयांना सहकार्य करतो. अशातच तीन वर्षांपूर्वी प्रत्येक स्मार्ट फोनमध्ये सहज डाऊन लोड करता येईल अशा टिकटॉकवर फावल्या वेळेत व्हिडिओ बनवण्याचे त्याला छंद जडला.

मागील दोन वर्षांपासून तो व्हिडिओ बनवतो. पहाटे तीन वाजता कामाला जायचे. तिकडून परत आला की दिवस भर तो व्हिडिओ बनवण्यात गुंग असायचा. दिवसाला कधी चार कधी पाच व्हिडिओ बनवायचा. टिकटॉक बंद झाले त्यादिवशी तो जेवला नाही. पण इतर अ‍ॅप वापरताना त्याला तो आनंद मिळत नाही. त्याने आतापर्यंत सुमारे १ हजार ६०० पेक्षा जास्त व्हिडीओ पोस्ट केले केल्याचे तो सांगतो. त्याला २ लाख १५ हजार फॉलोअर्स आहे. २.८ मिलियन लाईक त्याचा व्हिडिओला चाहत्यांनी दिले आहेत.

टॅग्स :Tik Tok Appटिक-टॉक