रस्ता व पुलाअभावी शेतकºयांना त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 22:06 IST2017-09-28T22:06:05+5:302017-09-28T22:06:16+5:30
गावातून सोनेगाव (बाई) कडे जाणाºया मार्गाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. परिणामी, शेतकºयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वायगाव ते सोनेगाव रस्त्याची मागील कित्येक वर्षांपासून दुरूस्ती करण्यात आलेली नाही.

रस्ता व पुलाअभावी शेतकºयांना त्रास
लोकमत न्यूज नेटवर्क
वायगाव (नि.) : गावातून सोनेगाव (बाई) कडे जाणाºया मार्गाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. परिणामी, शेतकºयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वायगाव ते सोनेगाव रस्त्याची मागील कित्येक वर्षांपासून दुरूस्ती करण्यात आलेली नाही. यामुळे शेतकºयांना खड्ड्यांतून तथा नदीतूनच प्रवास करावा लागत आहे.
या मार्गावर वायगावसह सोनेगाव (बाई), सिरसगाव व अन्य गावांतील १५० शेतकºयांची शेती आहे. सोनेगाव येथे जाण्यासाठी हा मार्ग नजीकचा आहे; पण सध्या रस्त्याला नाल्याचे स्वरूप आले. या मार्गाने शेतीपयोगी अवजारे, खत, बियाणे नेताना तारेवरची कसरत करावी लागते. अन्यथा १० किमी अधिक अंतर कापून शेतात साहित्य न्यावे लागते. रस्त्याची दुरवस्था असून भदाडी नाल्यावर पूल नसल्याने पाणी व चिखलातून वाट काढावी लागते. काही वर्षांपूर्वी खडीकरणासाठी साहित्य आले होते; पण मुरूम, गिट्टी पुन्हा उचलून नेण्यात आली. काम न करताच रस्ता पूर्ण केल्याचे दर्शविले जात असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी विजय घोडे, प्रकाश घोडे, सुरेश जोगे, रमेश घोडे, नामदेव घोडे, सुरकार, कारणकर, वैतागे, रेवतकर आदींनी निवेदनातून केली आहे.