चार महिन्यांपासून शेतकरी मारताहेत बँके त हेलपाटे

By Admin | Updated: October 3, 2015 01:59 IST2015-10-03T01:59:09+5:302015-10-03T01:59:09+5:30

येथील व्यवस्थापकाच्या हेकेखोर स्वभावामुळे शेतकरी त्रस्त झाले आहे. कर्जासाठी गेलेल्या शेतकऱ्याला सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत ताटकळत उभे राहवे लागते.

Halfway between the farmers and the farmers for four months | चार महिन्यांपासून शेतकरी मारताहेत बँके त हेलपाटे

चार महिन्यांपासून शेतकरी मारताहेत बँके त हेलपाटे

जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार : नाईलाजाने घेतले खासगी कर्ज
विजयगोपाल : येथील व्यवस्थापकाच्या हेकेखोर स्वभावामुळे शेतकरी त्रस्त झाले आहे. कर्जासाठी गेलेल्या शेतकऱ्याला सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत ताटकळत उभे राहवे लागते. जून महिन्यापासून अर्ज करूनही अनेक शेतकऱ्यांना अद्याप कर्जाचे वाटप झालेले नाही. बँक व्यवस्थापकावर कारवाई करण्याची मागणी येथील नरेश गिरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
येथील अलाहाबाद बँकचे व्यवस्थापक हे जूनमध्ये बदलून आले तेव्हापासून नवीन व्यवस्थापकाच्या उद्धट स्वभामुळे शेतकरी त्रस्त झाले आहे. येथील शेतकरी बँकेत पुनर्गठन व नवीन कर्जासाठी बँकेत गेले असता त्यांना तीन ते चार महिन्यांपासून बँकेच्या हेलपाट्या माराव्या लागत आहे. अद्यापही बहुतेक शेतकऱ्यांच्या कर्जाने ना पुनर्गठन झाले ना त्यांना कर्ज मिळाले. बँकेत चकरा मारून थकलेल्या शेतकऱ्यांनी अखेर खासगी कर्ज घेऊन शेतीची लागवड केल्याचे शेतकरी सांगत आहेत. चार ते पाच महिन्यापासून बँकेमध्ये उपाशा पोटी शेतीचे कामधंदे सोडून बँक व्यवस्थापकाकडे चकरा मारल्या. तरीही कर्ज न मिळाल्याचे येथील शेतकरी नरेश गुलाबसा गिरी सांगतात. पेरणीच्या वेळेस कर्ज न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात जावे लागले. त्यामुळे बँक व्यवस्थापकावर ताबडातोब कार्यवाही करण्याची मागणी गिरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.(वार्ताहर)

Web Title: Halfway between the farmers and the farmers for four months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.