शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

निम्म्या वर्धा शहराला तीन दिवस मिळणार नाही पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 05:00 IST

 वर्धा पाटबंधारे विभाग, वर्धा नगरपालिका प्रशासन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने धाम नदी स्वच्छता अभियान राबविण्याचे निश्चित करण्यात आले. त्याला जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी २७ मे रोजी मान्यता दिल्यानंतर शुक्रवार २८ मेपासून प्रत्यक्ष गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. पाच पोकलेनच्या साहाय्याने सध्या धाम नदीतील गाळ काढला जात असून हे काम युद्धपातळीवर पूर्ण केले जात आहे.

ठळक मुद्देयेळाकेळीत ‘धाम’ होतेय स्वच्छ : पाणी जपून वापरण्याचे न.प.चे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : धाम नदीच्या पवनार व येळाकेळी येथील पात्रातून पाण्याची उचल करून वर्धा नगरपालिका प्रशासन वर्धा शहरातील सुमारे १७ हजार कुटुंबाला पाणी पुरवठा करते. पण सध्या येळाकेळी येथील धाम नदीचे पात्र बजाज फाऊंडेशनच्या मदतीने वर्धा पाटबंधारे विभाग करीत आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस शहरातील अर्ध्या परिसरात पाणी पुरवठा होणार नसल्याचे नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन वर्धा नगरपालिका प्रशासनाने केले आहे. वर्धा पाटबंधारे विभाग, वर्धा नगरपालिका प्रशासन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने धाम नदी स्वच्छता अभियान राबविण्याचे निश्चित करण्यात आले. त्याला जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी २७ मे रोजी मान्यता दिल्यानंतर शुक्रवार २८ मेपासून प्रत्यक्ष गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. पाच पोकलेनच्या साहाय्याने सध्या धाम नदीतील गाळ काढला जात असून हे काम युद्धपातळीवर पूर्ण केले जात आहे. धाम नदीची पाणी साठवण क्षमता वाढावी तसेच ती स्वच्छ व्हावी हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. शनिवारी वर्धा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी सुनील रहाणे, वर्धा नगरपालिका पाणी पुरवठा विभागाचे नीलेश नंदनवार आदींनी येळाकेळी गाठून प्रत्यक्ष सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. सलग तीन दिवस नळाला पाणी येणार नसल्याने नागरिकांनाही उपलब्ध पाण्याचा काटकसरीनेच वापर करावा लागणार आहे.

या भागातील नळांना येणार नाही पाणी- धाम नदीपात्र स्वच्छ केले जात असल्याने वर्धा शहरातील गौरक्षण वॉर्ड, कृष्णनगर, बॅचलररोड, राजकला टॉकीज रोड, भामटीपुरा, तेलीपुरा, साईमंदिर रोड, निर्मल बेकरी, रामनगर, धंतोली, पोद्दार बगिचा, इंदिरा मार्केट, वंजारी चौक, सराफ लाईन, अंबिका चौक, पटेल चौक, गुजराती भवन, पावडे चौक, राधानगर, म्हाडा कॉलनी, मानस मंदिर, गजानननगर, गोंड प्लॉट, स्टेशन फैल, तारफैल, दयालनगर, अशोकनगर, एम.जी. कॉलनी, जाकीर हुसैन कॉलनी या भागात पुढील तीन दिवस पाणी पुरवठा होणार नाही.

तीन दिवसांत काढणार २५ हजार घनमीटर गाळ- धाम स्वच्छता अभियान अंतर्गत तीन दिवसांत किमान २५ हजार घनमीटर गाळ नदीपात्रातून काढण्यात येणार आहे. पोखलेनच्या मदतीने दोन मीटर खोल व बंधाऱ्यापासून १ किमी लांब पोखरून धाम नदीपात्रात गाळ काढण्यात येणार आहे. या कामासाठी जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्था विशेष सहकार्य करीत आहे.

येळाकेळी येथील धाम नदीपात्रातील गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. जानकीदेवी बजाज ग्रामीण विकास संस्थेचे विशेष सहकार्य या कामाला लागत आहे. तीन दिवसांत किमान २५ हजार घनमीटर गाळ काढण्याचे उद्दिष्ट आहे.- सुनील रहाणे, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, वर्धा. 

येळाकेळी येथील धाम नदीपात्रातून गाळ काढल्या जात असल्याने पुढील तीन दिवस वर्धा शहरातील अर्ध्या भागाला पाणी पुरवठा होणार नाही. त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा. - नीलेश नंदनवार, अभियंता, पाणी पुरवठा विभाग, न.प. वर्धा.

 

टॅग्स :riverनदीWaterपाणी