शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

निम्म्या लालपरी धावताहेत रस्त्यावर; प्रवाशांची वाढली गर्दी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2022 05:00 IST

शासनात विलीनीकरणासह  विविध मागण्यांसाठी कर्मचारी संपावर गेले असून, अद्यापही तोडगा निघाला नाही. बरेच दिवसांच्या संपानंतर अनेक कर्मचारी कामावर रुजू झाले तर काही अद्यापही संपावरच आहे. त्यामुळे आगारातील ४० ते ५० टक्के बससेवाच सुरु आहे. याचाच फायदा घेत खासगी वाहतूकदारांकडून ग्रामीण प्रवाशांची लूट चालविल्याचे चित्र दिसून येत असल्याने यासंदर्भात योग्य निर्णय घेण्याची गरज आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा (आर्वी) : राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस पूर्ण संख्येने सुरु झाल्या नसल्या तरी निम्या बसेस रस्त्यावर धावत आहे. बसचा प्रवास सुरक्षित मानल्या जात असल्याने प्रवाशांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. परिणामी महामंडळाच्या उत्पन्नातही आता वाढ होत आहे. मागील चार महिन्यांपासून राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरु असल्याने बससेवा ठप्प आहे. परिणामी सर्वसामान्य प्रवाशांचे चांगलेच हाल होत आहे. शासनाच्या आदेशानुसार बहुतांश कर्मचारी कामावर रुजू झाले असून निम्मे बसेस रस्त्यावर आल्या आहे. बसेच धावायला लागल्याने प्रवाशांचीही गर्दी वाढत आहे. परंतु खेडेगावात अद्यापही बस पोहोचली नसल्याने गावातील प्रवाशांना खासगी वाहनांचाच आधार घ्यावा लागत आहे.  अशातच खासगी वाहनचालकही प्रवाशांकडून दामदुप्पट प्रवासभाडे वसूल करीत आहे. शासनात विलीनीकरणासह  विविध मागण्यांसाठी कर्मचारी संपावर गेले असून, अद्यापही तोडगा निघाला नाही. बरेच दिवसांच्या संपानंतर अनेक कर्मचारी कामावर रुजू झाले तर काही अद्यापही संपावरच आहे. त्यामुळे आगारातील ४० ते ५० टक्के बससेवाच सुरु आहे. याचाच फायदा घेत खासगी वाहतूकदारांकडून ग्रामीण प्रवाशांची लूट चालविल्याचे चित्र दिसून येत असल्याने यासंदर्भात योग्य निर्णय घेण्याची गरज आहे. 

ग्रामीण भागात बसेस कधी जाणार..-    जिल्ह्यामध्ये पाच आगार असून २१३ बसेस आहे. संपापूर्वी नियमित ७५ हजार किलोमीटर बसेस धावायच्या. परंतु सध्या संपामुळे शंभरावर बसेस धाव आहे. अनेक गावांमध्ये आणि लांब पल्ल्याच्या बसेस सोडल्या जात नाही. त्याचा फटका प्रवांशाना बसत आहे. ग्रामीण भागातील शेतकरी, विद्यार्थी व रुग्णांना बस नसल्याने खाजगी वाहनांचा सहारा घ्यावा लागतो. त्यामुळे ग्रामीण भागात बसेस कधी जाणार? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहे.

गत चार महिन्यांत बसला फटका

-   आर्वी आगारातून ४८ बसेस १७ हजार किलोमीटर धावत होत्या. यातून पाच लाखांचे सरासरी उत्पन्न होते. संपकाळात सर्व बसेस बंद होत्या. त्यामुळे या आगाराला ५ कोटींचे नुकसान झाले. तर वर्धा आगारामध्ये ६१ बसेस २१ हजार किलोमीटर धावत होत्या. त्यातून आठ लाखांचे उत्पन्न मिळायचे. जिल्ह्यातील पाचही आगारांना जवळपास २५ कोटींचा फटका बसला आहे. 

आगार प्रमुख काय म्हणतात...

सध्या जिल्ह्यात शंभरच्यावर एसटी धावत असून प्रवाशांची गर्दी आहे. मात्र कर्मचारी नसल्याने  अद्यापही लांब पल्ल्याच्या आणि ग्रामीण भागात बसेस सोडता येत नाही. यामुळे प्रवाशांची तारांबळ होत आहे. संपकऱ्यांच्या बाबतीत २२ तारखेला निर्णय होणार असल्याची माहिती आहे.राजाभाऊ पंधरे, आगारप्रमुख,पुलगाव 

आर्वी आगारात सध्या २५ बसद्वारे प्रवाशांची सेवा सुरु आहे. कर्मचाऱ्यांच्या उपलब्धतेप्रमाणे बसेस सोडण्यात येत असून ९० फेऱ्या होत आहे. मात्र ग्रामीण भागात आणि लांब पल्ल्याच्या गाड्या कमतरतेमुळे सोडता येत नाही. विनोद खंडार, बसस्थान, प्रमुख आर्वी आगार

 

टॅग्स :ST Strikeएसटी संप