लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : अनधिकृतपणे गौणखनिज काढण्यासाठी, हलविण्यासाठी, गोळा करण्यासाठी किंवा विल्हेवाट लावण्यासाठी वापरलेली यंत्रसामग्री, साधनसामग्री तसेच वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यासंदर्भात शासनाकडून वाहने व साधनानिहाय शास्तीची रक्कम ठरवून दिली आहे. यामध्ये हाफ बॉडी ट्रक व फुल बॉडी ट्रक असे वर्गीकरण करण्यात आले आहे. मात्र, आता हाफ बॉडी ट्रक अस्तित्वातच नसताना या ‘हाफ बॉडी, फुल बॉडी’ च्या भानगडीत दंडात्मक कारवाई करताना अडचणी येत आहेत.जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळू व मुरुम या गौणखनिजांची वाहतूक केली जाते. गौणखनिजांचा उपसा करण्यासाठी विविध साधने व मशीन उपयोगात आणतात. वाहतुकीकरिता ट्रॅक्टर, ट्रक व डंपरचा वापर होतो. शासनाच्या १२ जानेवारी २०१८ च्या अधिसूनेनुसार ग्रामीण जमीन महसूल संहिता १९६६ (१९६६ चा महा.४१) यांच्या कलम ४८ च्या पोट कलम (८) च्या तरतूदीनुसार जप्त केलेली अनधिकृतपणे गौण खनिज वाहतूकीसाठी वापरलेली वाहने वैयक्तिक जात मुचलका सादर केल्यानंतर सोडविण्यासाठी शासनाने ट्रॅक्टर आणि हाफ बॉडी ट्रक करिता एक लाख रुपये तर फुल बॉडी ट्रक व डंपर करिता दोन लाख रुपये शास्तीची रक्कम ठरवून दिली आहे.आपल्याकडी हाफ बॉडी ट्रक केव्हाचाच कालबाह्य झाला आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र ट्रॅक्टर, ट्रक किंवा डंपरच्याच सहाय्याने गौणखनिजाची वाहतूक केली जाते. गौणखनिजाची अवैध वाहतूक करताना अधिकाऱ्यांनी ट्रक पकडल्यास दंडात्मक कारवाईदरम्यान तो हाफ बॉडी आहे की, फुल बॉडी, याची आधी शहानिशा करावी लागते. बऱ्याचदा त्याकरिता उपप्रादेशिक परिवहन विभागाला पत्र देऊन त्यांच्याकडून मार्गदर्शन मागविले जातात. यात बराच कालावधी जात असल्याने दंडात्मक कारवाई करतांना महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो.त्यामुळे काळानुसार शासनाच्या या अधिसूचनेतही बदल करण्याची गरज असून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. म्हणून हाफ बॉडी हा प्रकार वगळून फुल बॉडी ट्रक म्हणूनच नोंद घेत वाहनचालकांकडून किंवा गौणखनिज चोरट्यांकडून शास्तीची रक्कम वसूल करण्याची गरज आहे.दंडाची ही अधिसूचना अनेकांसाठी ठरतेय पळवाटमहसूल विभागातील काही अधिकारी तसेच गौणखनिज चोरटे यांचे हाफ बॉडी, फुल बॉडी च्या दंडात्मक कारवाई आड चांगलेच फावते आहे. गौणखनिजाची वाहतूक करतांना महसूल विभागाने ट्रक पकडून फुल बॉडीचा दंड ठोठावल्यास गौणखनिज चोरटे शासनाच्या या अधिसूचनेचा आधार घेऊन कारवाईबद्दल अपील करतात. त्यामुळे अधिकाºयांना आधीपासूनच हाफ बॉडी की फुल बॉडी याची शहानिशा करुन दंड आकारावा लागतो.बºयाचदा कारवाईत वाहने पकडल्यानंतर वाहन चालक किंवा गौणखनिज चोरटे अधिकाऱ्यांकडे धाव घेऊन दंड कमी करण्याचा आग्रह धरतात. काही तर अधिकाऱ्यांना थेट आॅफरही देतात. अशा परिस्थिती फुल बॉडी ट्रक असला तरीही त्याचा दंड कमी करण्यासाठी हाफ बॉडी ट्रक दाखवून दंड आकारतात, आणि हाफ बॉडी व फुल बॉडीच्या शास्तीच्या रक्कमेत असलेला फरकातील रक्कमेत तडजोड करतात. त्यामुळे ही अधिसूचना काही अधिकाऱ्यांसह मुरुम चोरट्यांसाठीही पळवाट ठरत असल्याने दिसून येत आहे.आपल्याकडे सध्या हाफ बॉडी ट्रक अस्तित्वाच राहिले नाही. फक्त ट्रॅक्टर आणि ट्रकच्याच सहाय्याने वाहतूक होत असल्याने ट्रॅक्टर आणि ट्रक या वाहनांच्या शास्तीच्या रक्कमेनुसारच दंडात्मक कारवाई करणे आवश्यक आहे.सुरेश बगळे, उपविभागीय अधिकारी, वर्धा
‘हाफ बॉडी,फुल बॉडी’मुळे महसूलची होतेय गफलत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 06:00 IST
आपल्याकडी हाफ बॉडी ट्रक केव्हाचाच कालबाह्य झाला आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र ट्रॅक्टर, ट्रक किंवा डंपरच्याच सहाय्याने गौणखनिजाची वाहतूक केली जाते. गौणखनिजाची अवैध वाहतूक करताना अधिकाऱ्यांनी ट्रक पकडल्यास दंडात्मक कारवाईदरम्यान तो हाफ बॉडी आहे की, फुल बॉडी, याची आधी शहानिशा करावी लागते. बऱ्याचदा त्याकरिता उपप्रादेशिक परिवहन विभागाला पत्र देऊन त्यांच्याकडून मार्गदर्शन मागविले जातात.
‘हाफ बॉडी,फुल बॉडी’मुळे महसूलची होतेय गफलत
ठळक मुद्देकारवाई करताना अडचण : आदेशाचा गौणखनिज चोरटे घेतात आधार