गिरड भागाला गारपिटीचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 05:00 AM2020-03-15T05:00:00+5:302020-03-15T05:00:08+5:30

शुक्रवारच्या रात्रीला झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चणा, गहू, कापूस या पिकांना जबर फटका बसला आहे. चना , गहु ही पिके पुर्णपणे झोपुन गेली आहे. गारपिटीची गार ही निंबाएवढी मोठी होती त्यामुळे घरच्या बाहेर उभ्या असलेल्या दुचाकीचे मीटर , लाईटला तडा गेल्या आहे . जीर्ण झालेली झाडे सुध्दा मोठया प्रमाणात तुटून पडली आहे ,

Hail hit the girder area | गिरड भागाला गारपिटीचा तडाखा

गिरड भागाला गारपिटीचा तडाखा

Next
ठळक मुद्देकापूस, चणा, गहू पीक जमीनदोस्त । नऊ गावांमध्ये शेतमालाचे ७० टक्के नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क
गिरड : शुक्रवारच्या रात्रीला झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चणा, गहू, कापूस या पिकांना जबर फटका बसला आहे. चना , गहु ही पिके पुर्णपणे झोपुन गेली आहे. गारपिटीची गार ही निंबाएवढी मोठी होती त्यामुळे घरच्या बाहेर उभ्या असलेल्या दुचाकीचे मीटर , लाईटला तडा गेल्या आहे . जीर्ण झालेली झाडे सुध्दा मोठया प्रमाणात तुटून पडली आहे , परिसरातील वीज खांबे सुध्दा यामध्ये वाकली आहेत. गारपिटीच्या जबर तडाख्याने पशुपक्षी मृत्युमुखी पडले आहे. कापणी मळणीकरिता जे पिकांचे ढग लावले होते त्याचे खुप नुकसान झाले आहे. कापुस या पिकांचा शेवटचा वेचा शिल्लक होता तो कापूस भिजला.या गारपिटीचा फटका मोहंगाव, आर्वी, तावी, फरीदपुर, धोंडगाव, भवानपूर, अंतरगाव, पिंपळगाव, वडगांव या गावांना सुध्दा बसला आहे. या गावातील शेतकऱ्यांचे ७०% नुकसान झाले आहे . शासनाने या नुकसानीची दखल घेत पंचनाम्याचे आदेश देऊन झालेली नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. आपल्या ४१ वर्षांच्या आयुष्यात असे गारपिट पाहिले नाही अशी माहिती गिरड येथील शेतकरी अशोक गडमवार यांनी दिली आहे.

गव्हाला फुटले कोंब ६क्विंटल गहू सडला
चिकणी (जामणी) : सोमवारच्या मध्यरात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे चिकणीसह पढेगाव,जामणी निमगाव व परिसरातील शेतातील उभ्या पिकांना फटका बसला. मळणी केलेल्या चणा, गव्हाच्या उत्पादनावर मोठ्या प्रमाणात झाला. येथील शेतकरी प्रकाश डफरे याने दोन एकर शेतात गव्हाची लागवड केली होती. आणि रविवारला हार्वेस्टरच्या सहाय्याने गव्हाची काढणी केली. निघालेला गहू थोडा ओलसर असल्यामुळे शेतातच ताडपत्रीवर गव्हाचा ढीेग करुन ठेवला आणि वरुन ताडपत्रीने झाकून ठेवला पण सोमवारच्या मध्यरात्री अवकाळी पावसाने घात केला. दोन एकर शेतात डफरे यांना २० क्विंटल गहू झाला परंतु ढिगात पाणी शिरल्यामुळे खालच्या भागातील किमान ६ ते ७ क्विंटल गहू सडला व काही गव्हाला कोंब सुद्धा निघाले यामुळे हाता तोंडाशी आलेला पीक अवकाळी पावसाने हिरावून घेतले आहे.

Web Title: Hail hit the girder area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस