धम्म प्रशिक्षण व व्यक्तिमत्व विकास शिबिरातून युवकांना मार्गदर्शन
By Admin | Updated: November 5, 2016 01:03 IST2016-11-05T01:03:31+5:302016-11-05T01:03:31+5:30
सद्धम्म प्रचार केंद्राचे १६६ वे धम्म प्रशिक्षण व व्यक्तीमत्व विकास शिबिराचा गुरूकृपा कॉलनी, जुनापाणी चौक येथे प्रारंभ झाला.

धम्म प्रशिक्षण व व्यक्तिमत्व विकास शिबिरातून युवकांना मार्गदर्शन
सद्धम्म प्रचार केंद्राचा उपक्रम
वर्धा : सद्धम्म प्रचार केंद्राचे १६६ वे धम्म प्रशिक्षण व व्यक्तीमत्व विकास शिबिराचा गुरूकृपा कॉलनी, जुनापाणी चौक येथे प्रारंभ झाला. या शिबिराचे उद्घाटन इंजि. विजय नाखले यांनी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आचार्य बी.सी. वानखेडे तर प्रमुख अतिथी म्हनून प्रा. नुतन माळवी, धनंजय नाखले, मधुकर सवाळे, गुलाब नेवारे, सुधीर वानखेडे उपस्थित होते.
यावेळी तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करुन सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. यावेळी बोलताना विजय नाखले म्हणाले, बुद्धाशिवाय जगाला पर्याय नाही. तर आचार्य बी.सी. वानखेडे यांनी बुद्ध तत्वज्ञान हे मानवी जीवनाच्या उद्धारासाठी कसे महत्वाचे आहे हे विविध उदाहरणासह पटवून दिले. यानंतर बोलताना नूतन माळवी यांनी पंचशीलातील तत्व सांगितले. पंचशीलाने मानवाचे जीवन कसे मंगल होते ते सांगितले. याप्रसंगी भारतीय राज्यघटना स्वअक्षरात लिहणारे व लिम्का बुकमध्ये नोंद झालेले धनंजय नाखले यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजू थुल यांनी केले. संचालन धम्मसेवक प्रणोज बनकर तर आभार सुनील ढाले यांनी मानले. शिबिराला धम्मसेवक प्रणोज बनकर, दीक्षा मेश्राम, रोशन इंगोले, वनिता मेश्राम, भीमराव गाडगे, शीला डोके, शालिनी हाडेकर, प्रभाकर मगर, लांडगे, गवळी, रत्नमाला बनकर यांनी सहकार्य केले.(स्थानिक प्रतिनिधी)