कापूस उत्पादन वाढविण्यासाठी मार्गदर्शन मेळावा
By Admin | Updated: November 4, 2015 02:29 IST2015-11-04T02:29:51+5:302015-11-04T02:29:51+5:30
जिल्हा कापूस पथदर्शी प्रकल्पांतर्गत हिंगणघाट येथील गिमा टेक्सटाईल्स येथे कापूस उत्पादन वाढसाठी मार्गदर्शन मेळावा

कापूस उत्पादन वाढविण्यासाठी मार्गदर्शन मेळावा
वर्धा : जिल्हा कापूस पथदर्शी प्रकल्पांतर्गत हिंगणघाट येथील गिमा टेक्सटाईल्स येथे कापूस उत्पादन वाढसाठी मार्गदर्शन मेळावा व चर्चासत्र घेण्यात आले. यामध्ये जिनींग प्रेसींग इंडस्ट्रीस, टेक्सटाईल्स आणि कापूस खरेदीदार आदींचा समावेश होता.
कापूस उत्पादन वाढून उत्पादन खर्च कमी व्हावा यासाठी राज्य शासन कृषी विभाग, भारतीय वस्त्र उद्योग आणि बायर क्रॉप सायन्स यांच्या संयुक्त सहभागातून वर्धा जिल्ह्यात पथदर्शी प्रकल्प हिंगणघाट, वर्धा, देवळी आणि सेलू या चार तालुक्यात राबविण्यात येत आहे.
हिंगणघाट येथील शिबिरात कॉनफेडरेशन आॅफ इंडियन टेक्सटाईल्सचे सल्लागार एस.ए. घोरपडे, प्रकल्प समन्वयक जी.ए. वैराळे, बायर क्रॉप सायन्सचे सुशील देसाई, प्रभाकर चांभारे, गावंडे, गिमा टेक्सटाईल्सचे बाबू मोहता, तालुका कृषी अधिकारी साखरे, रामेकर, प्रसन्नकुमार बईरकर, चंदाराणा आदींसह कापूस उत्पादक शेतकरी उपस्थित होते. यावेळी आयोजित चर्चासत्रात शेतकऱ्यांना कापूस उत्पदानावरील खर्च कमी करून लागवडी पासून विक्री पर्यंतच्या प्रवासादरम्यान मार्गदर्शन करण्यात आले. तसेच कापसाच्या जातीचे प्रत्यक्षिक दाखवून शासनाच्या कापूस उत्पादनासाठी असलेल्या नियोजनाची माहिती यावेळी उपस्थितांना देण्यात आली. शासनाच्या कापूस उत्पादनासाठी असलेल्या नियोजनाची माहिती या मेळाव्यात देण्यात आली. तालुका कृषी अधिकारी साखरे यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी शेगाव(कुंड)चे सरपंच मधुसूदन हरणे, परआग कोचर, मॅडमवार यासह इतरही नागरिक व शेतकरी उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)