एचआयव्ही एड्सवर मार्गदर्शन
By Admin | Updated: September 15, 2014 00:19 IST2014-09-15T00:19:31+5:302014-09-15T00:19:31+5:30
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेद्वारा अनुदानित आणि नोबल शिक्षण संस्थेद्वारे संचालित लिंक वर्कर स्किम वर्धा व ग्रामीण रुग्णालय पुलगाव यांचे संयुक्त विद्यमाने यशवंत कनिष्ठ महाविद्यालय विजयगोपाल

एचआयव्ही एड्सवर मार्गदर्शन
वर्धा : महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेद्वारा अनुदानित आणि नोबल शिक्षण संस्थेद्वारे संचालित लिंक वर्कर स्किम वर्धा व ग्रामीण रुग्णालय पुलगाव यांचे संयुक्त विद्यमाने यशवंत कनिष्ठ महाविद्यालय विजयगोपाल येथे युवक-युवतींकरिता जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाला प्राचार्य एस. व्ही. लाभे , एस. आर. मुंजेवार, एम. व्ही. भोसले, आर.एस. निमसरे, समुपदेशिका कल्पना टोणपे, कार्यक्रम अधिकारी सुचिता बोभाटे आदी मान्यवर उपस्थित होते. समुपदेशिका कल्पना टोनपे यांनी मार्गदर्शनात सकारात्मक विचारधारणा, युवाशक्तीचे महत्त्व, किशोर अवस्थामध्ये होणारे बदल, एच. आय. व्ही. एड्स हा आजार कशाने होतो याबद्दलची माहिती त्यांनी आली. तसेच एच.आय.व्ही.ची चाचणी ग्रामीण रुग्णालय, सामान्य रुग्णालयामध्ये मोफत करुन देण्यात येते व त्याचा अहावाल हा गोपनीय ठेवण्यात येतो. याकरिता प्रत्येकाने एच.आय.व्ही.ची चाचणी करणे काळाची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. शासनाच्या विविध योजनांचीही माहिती दिली. कार्यक्रम अधिकारी सुचिता बोभाटे यांनी युवक-युवतीमधील शारीरिक व मानसिक बदल तसेच कुठल्याही व्यसनाच्या आहारी न पडता कुटुंबाप्रति पाल्य म्हणून आपली काय भूमिका असायला पाहिजे याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी युवक-युवतींच्या मनातील शंकांचे निराकरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन संध्या म्हैसकर यांनी केले. आभार माधुरी पोटे हिने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता प्राचार्य लाभे, प्रवीण पुनवटकर, विजय मानवटकर, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.(शहर प्रतिनिधी)