किटकनाशके हाताळणी करण्याबाबत मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 22:33 IST2017-10-30T22:32:52+5:302017-10-30T22:33:11+5:30
किटकनाशकांची हाताळणी करताना काय काळजी घ्यावी याबाबत आर्वी, आष्टी व कारंजा (घा.) तालुक्यातील सर्व कृषी निविष्ठाधारकांची सभा येथील कृषी चिकित्सालयात पार पडली.

किटकनाशके हाताळणी करण्याबाबत मार्गदर्शन
लोकमत न्यूज नेटवर्क
तळेगाव (श्या.पं) : किटकनाशकांची हाताळणी करताना काय काळजी घ्यावी याबाबत आर्वी, आष्टी व कारंजा (घा.) तालुक्यातील सर्व कृषी निविष्ठाधारकांची सभा येथील कृषी चिकित्सालयात पार पडली.
सभेला कृषी विकास अधिकारी आर.पी. धर्माधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी सांगळे, तालुका कृषी अधिकारी प्रशांत गुल्हाणे यांची प्रमुख उपस्थिती होती. कृषी विस्तार अधिकारी देवकर, कारंजा (घा.) यांनी चित्रफित दाखवून मार्गदर्शन केले. किटकनाशक फवारणी करताना विषबाधा होऊ नये याकरिता काय काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन करून उपस्थितांना घडीपत्रिकेचे वाटप करण्यात आले.
यानंतर फवारणी किटचा वापर कसा करावा याबाबत प्रात्यखिक दाखविण्यात आले. तसेच सदर माहिती शेतकºयांपर्यंत पोहचवावी असे आवाहन करण्यात आले. सभेचे संचालन व आभार प्रदर्शन विस्तार अधिकारी आर.डी. दुबे, आष्टी यांनी केले. सभेला तिनही तालुक्यातील कृषी निविष्ठा केंद्रधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.