जागृती व शिक्षा उपक्रमांवर मार्गदर्शन
By Admin | Updated: July 12, 2014 01:42 IST2014-07-12T01:42:01+5:302014-07-12T01:42:01+5:30
भारत सरकारच्या युवा आणि क्रीडा मंत्रालय अंतर्गत नेहरू युवा केंद्र व द्वारकाधिश सामाजिक विकास संस्था, ....

जागृती व शिक्षा उपक्रमांवर मार्गदर्शन
वर्धा : भारत सरकारच्या युवा आणि क्रीडा मंत्रालय अंतर्गत नेहरू युवा केंद्र व द्वारकाधिश सामाजिक विकास संस्था, तळेगाव (रघुजी) यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जागृती व शिक्षा कार्र्यक्रमातून युवकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
आर्वी येथे आयोजित कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शंकर रूईकर होते. याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून तळेगाव उपसरपंच धनराज गळाट, प्रमुख अतिथी म्हणून बाबाराव साठे, संस्थेचे अध्यक्ष पुष्पराज कालोकार, महेश डुबे हे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना गळाट म्हणाले, युवा पिढीने समाजामध्ये सांप्रदायिकता, सद्भाव आणि सद्भावना निर्माण करण्यासाठी सदैव प्रयत्न करावे. जबाबदार नागरिक असलेल्या युवकांनी साक्षर होवून एक सजग नागरिक बनून विकासात योगदान द्यावे, असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश डुबे यांनी केले. कार्यक्रमाची रूपरेषा विषद करताना त्यांनी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा थोडक्यात जीवन परिचय दिला.
कार्यक्रमात सशक्त कन्या, सशक्त भारत या विषयावर प्रफुल्ल बुटे, दीपक तपासे, विकास कांबळे, भाग्यश्री शेंडे, गौरी, नितीन वाघमारे, वादक यांनी पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली. यातून उपस्थितांना महिलांविषयी आदराची भावना, समानतेची वागणूक देण्याचा संदेश दिला. तसेच शिक्षा व जागृती आणि स्वयंरोजगार याविषयी युवकांना मार्गदर्शन करण्यात आले.
कार्र्यक्रमाच्या आयोजनाला नरेश कालोकार, किशोर पंधराम, अमोल कालोकार, निलेश गळाट, राजू रूईकर, यशवंत चकोले, माधव पारधी, वैभव तिनघसे, गजानन पंधराम, गजानन भोयर आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन डुबे यांनी केले तर आभार संस्थेचे सचिव लोभेश्वर आसोले यांनी केले.(शहर प्रतिनिधी)