गट व गणांत भाजपाची बल्ले बल्ले!
By Admin | Updated: February 24, 2017 02:20 IST2017-02-24T02:20:15+5:302017-02-24T02:20:15+5:30
सहा पैकी भाजपाने जि.प. च्या पाच व पं.स.च्या आठ जागांवर विजय मिळवित मिळविला. गट व गणात काँग्रेसचा धुव्वा उडविला.

गट व गणांत भाजपाची बल्ले बल्ले!
काँग्रेसचे पानिपत : पाच जि.प. व बारा गणांत भाजपाला यश
देवळी : सहा पैकी भाजपाने जि.प. च्या पाच व पं.स.च्या आठ जागांवर विजय मिळवित मिळविला. गट व गणात काँग्रेसचा धुव्वा उडविला. अंदोरी जि.प.ची जागा राष्ट्रवादीला राखता आली. भाजपाचे खा. रामदास तडस व काँग्रेसचे आ. रणजीत कांबळे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. विधानसभेची रंगीत तालीम म्हणून याकडे पाहिले जात होते. विधानसभा मतदार संघाचा कानोसा घेण्यासाठी यंत्रणा राबविली. कॉगे्रस बालेकिल्ला भिडी गटात भगदाड पडले.
येथे भाजपाचे मुकेश भिसे यांनी मुसंडी मारून आ. कांबळे यांचे खास मनोज वसू यांना चित केले. हा पराभव काँग्रेसच्या जिव्हारी लागणारा ठरला. गुंजखेडा गटात भाजपाच्या वैशाली येरावार यांनी काँग्रेसच्या माजी जि.प. सदस्य मालती ठोंबरे यांचा पराभव केला. गौळ गटात भाजपाच्या मयूरी मसराम, नाचणगाव गटात प्रवीण सावरकर व इंझाळा गटात सुनीता राऊत यांनी विजय मिळविला. अंदोरी गटात राष्ट्रवादीचे विद्यमान जि.प. सदस्य संजय कामनापुरे विजयी झाले. कामनापुरे कुटुंबियांनी विविध गटात ५ वेळा विजयाची हॅटट्रीक केली.
बारा पं.स. गणाच्या निवडणुकीत भाजप आठ, काँग्रेस तीन व अपक्षाने एका जागेवर बाजी मारली. गौळ पं.स. मध्ये भाजपाच्या विद्या दशरथ भुजाडे यांनी काँग्रेसचे विद्यमान जि.प. सदस्य मोरेश्वर खोडके यांच्या पत्नी उज्वला खोडके यांचा पराभव केला. नांदोरा गणात आरती राजू इंगोले विजयी झाल्या. गुंजखेडा पं.स. मध्ये काँग्रेसचे अशोक इंगळे व आगरगाव गणात भाजपाच्या कुसूम चौधरी विजयी झाल्या. त्यांनी काँग्रेसचे विद्यमान जि.प. सदस्य मोहन शिदोडकर यांच्या पत्नी मीनाक्षी शिदोडकर यांचा पराभव केला. इंझाळा गणात भाजपाचे युवराज खडतकर व सोनोरा ढोक गणात काँग्रेसच्या कल्याणी ढोक विजयी झाल्या. नाचणगाव ८३ गणात माजी जि.प. सदस्य दिलीप अग्रवाल मताधिक्याने विजयी झाले. नाचणगाव ८४ गणात भाजपाचे किशोर गव्हाळकर विजयी झाले. अंदोरी गणात काँग्रेसच्या साधना मून पाच मतांच्या फरकाने विजयी झाल्या. येथे भाजपाच्या मागणीनुसार पुनर्मोजणी झाली. बोरगाव आलोडा गणात भाजपाच्या दुर्गा मडावी विजयी झाल्या. या गणात ३७९ मतदारांनी नोटाचा वापर केला.
भिडी व विजयगोपाल गणात भाजपाचे उमेदवार विजयी झाले. भिडी गणात शंकर उईके व विजयगोपाल गणात स्वप्नील खडसे विजयी झाले. सहा जि.प. गट व बारा प.स. गणाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांनी काट्याची लढत दिली. सुरुवातीपासूनच या लढतीकडे लोकांचे लक्ष लागले होते.(प्रतिनिधी)