सर्वत्र महात्मा जोतिबा फुले यांच्या स्मृतीस अभिवादन

By Admin | Updated: November 30, 2015 02:02 IST2015-11-30T02:02:08+5:302015-11-30T02:02:08+5:30

विविध शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था आदींच्या कार्यालयांत महात्मा जोतिबा फुले पुण्यतिथी कार्यक्रम घेऊन त्यांना अभिवादन करण्यात आले.

Greetings to the memory of Mahatma Jotiba Phule everywhere | सर्वत्र महात्मा जोतिबा फुले यांच्या स्मृतीस अभिवादन

सर्वत्र महात्मा जोतिबा फुले यांच्या स्मृतीस अभिवादन

विविध कार्यक्रम : फुले यांच्या स्त्री-शिक्षणविषयक कार्याला आढावा
वर्धा : विविध शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था आदींच्या कार्यालयांत महात्मा जोतिबा फुले पुण्यतिथी कार्यक्रम घेऊन त्यांना अभिवादन करण्यात आले.
जि.प. उच्च प्राथमिक शाळा, आरंभा
वर्धा : जि.प. उच्च प्राथमिक शाळा आरंभा येथे महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनामिमित्त आदरांजली कार्यक्रम घेण्यात आला. राजू मीना मंचच्या सदस्यांनी महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित एक लोकगीत सादर केले. मुख्याध्यापक जी.एस. खोडे यांनी महात्मा फुले यांच्या जीवनावर भाष्य करताना शिक्षण व सामाजिक क्षेत्रात महात्मा फुले यांच्या विचारांची नितांत आवश्यकता असल्याचे सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांमधून साहिल मांडवकर, निखिता लढी, दुर्गा तिवाडे, मंगला लालसरे, संकेत बगडे, सोनिया भोसले यांनीसुद्धा आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गजानन जवादे, मुख्याध्यापक जी. एस. खोडे, एस.डी. खडसे, एम. जी. ठमके, सी. बी. कुकडे यासह शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन दीपक मांडवकर यांनी केले. आभार देवकन्या नांदे हिने मानले.
ज्ञानभारती विद्यालय
पुलगाव : स्थानिक ज्ञानभारती प्राथमिक विद्यालय, माध्यमिक व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात महात्मा जोतिबा फुले यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य रतन येसनकर तर प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापिका जी.एस. तेलगोटे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय कुंभारे यांनी केले. लता डोंगरे, सुनीता भुरकुंडे, अर्चना पोटदुखे, सागर टिप्रमवार यांनी जोतिबा फुले यांनी स्त्रियांच्या विकासाकरिता केलेल्या भरीव कार्याविषयी सविस्तर माहिती दिली. मान्यवरांनी महात्मा फुले यांचे कार्य व त्यावेळची स्थिती याबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन प्रदीप रावेकर यांनी केले. आभार आशा जयसिंगकार यांनी मानले. कार्यक्रमाला शोभा वासनकर, प्रशांत नानोटी, वनिता मडावी, सुनील शिलस्कार, नंदकिशोर बिजागरे, रूपेश कुडूपले, श्वेता मोरे, श्रीकांत बोबडे, अतुल साळवे, हर्षवर्धन बोराडे, राहुल ससे, हरीश बहिरम, विजय कारणकर, मुकिंदा नेहारे उपस्थित होते.
मातोश्री कनिष्ठ महाविद्यालय
वर्धा : मातोश्री कनिष्ठ महाविद्यालय दहेगाव (मि.) येथे महात्मा जोतिबा फुले पुण्यतिथी कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सुनील गायकवाड यांनी केले. जोतिबा फुले यांनी स्त्रियांच्या शैक्षणिक विकासाकरिता केलेल्या कार्याविषयी त्यांनी माहिती दिली. संस्थेचे सचिव प्रमोद चौधरी यांनी त्यांच्या जीवन कार्यात घडलेल्या घडामोडींबद्दल माहिती दिली. प्रमुख पाहुणे म्हणून रवींद्र मोरणकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. आशिष मुडे, प्रा. मनोज गायकवाड, प्रा. घनश्याम मुडे, यशपाल इवनाथे आदीनी सहकार्य केले. संचालन प्राजक्ता बोरकुटे तर आभार प्रदीप वाघम यांनी मानले.
मॉडेल हायस्कूल
वर्धा : स्थानिक मॉडेल हायस्कूल सालोड येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस. बी. मसणे तर प्रमुख अतिथी म्हणून पी. एस. राऊत उपस्थित होते. याप्रसंगी प्रमोद डोळे यांनी म. जोतिबा फुले यांनी स्त्रियाच्या, दलितांच्या, शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता केलेल्या भरीव कार्याविषयी माहिती सांगितली. संचालन एन.एस. राऊत तर आभार खैरकार यांनी मानले. यशस्वीतेकरिता शिक्षक थुटे, अमिषा मनवर, अविनाश झाडे, रुचिका भोयर आदींनी सहकार्य केले.(लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Greetings to the memory of Mahatma Jotiba Phule everywhere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.