जिल्ह्यात महामानवाला अभिवादन

By Admin | Updated: December 7, 2015 06:01 IST2015-12-07T06:01:57+5:302015-12-07T06:01:57+5:30

भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त जिल्ह्यात

Greetings to the great guests in the district | जिल्ह्यात महामानवाला अभिवादन

जिल्ह्यात महामानवाला अभिवादन

 वर्धा : भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त जिल्ह्यात ठिकठिकाणी आंबेडकरी जनतेनी आदरांजली अर्पण केली. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. तसेच जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य विभागाने आठही पंचायत समितीअंतर्गत महारक्तदान शिबिराच्या माध्यमातून बाबासाहेबांना आदरांजली अर्पण केली. शिबिरात शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.
वर्धेत बाबासाहेबांना आदरांजली अर्पण करण्यासाठी सिव्हील लाईन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ अनुयायांची सकाळपासूनच रीघ लागली होती. जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी मानवंदना दिली. तसेच खासदार रामदास तडस, नगर परिषद अध्यक्ष त्रिवेणी कुत्तरमारे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास कांबळे, शिक्षण सभापती मिलिंद भेंडे, वर्धा सोशल फोरमचे जिल्हाध्यक्ष अभ्युदय मेघे, बसपा जिल्हाध्यक्ष मोहन राईकवार, माजी जिल्हाध्यक्ष निरज गुजर व उमेश म्हैसकर, रिपाइं(आ.) जिल्हाध्यक्ष विजय आगलावे, प्रकाश पाटील, रिपाइं (ग.)चे गोकुलदास पांडे, प्रमोद राऊत, डी. के. पाटील, शारदा झामरे, प्रा. नूतन माळवी, बंटी गोसावी, महेश मेंढे, अशोक मेश्राम, भाजपा अ. जा. सेलचे जिल्हाध्यक्ष वरूण पांडे, अरविंद चहांदे, प्रा. चंदू पोपटकर, किशोर खैरकार, विनोद राऊत, संघपाल राऊत, राहुल वाघमारे व अन्य मान्यवरांसह असंख्य अनुयायांनी पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले.
बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ बाबासाहेबांचा जीवनपट उलगडणाऱ्या विविध साहित्यांची दुकाने सजली होती. त्यांच्या कार्याची माहिती देणारे चित्रप्रदर्शनही लक्ष वेधत होते. मानवंदना देण्याकरिता येणाऱ्या प्रत्येकांची पावले या प्रदर्शनाकडे वळत होती. अनुयायांसाठी आयोजन समितीच्यावतीने पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात स्माईल पीपल्स बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यानिमित्त डॉ. आंबेडकर खासगी बसस्थानकाच्यावतीने संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ‘स्मरण भीमरायांचे’ हा भीमगीतांचा कार्यक्रमही पार पडला. या कार्यक्रमाला बाबासाहेबांचे अनुयायी मोठ्या संख्येने हजर होते.(लोकमत न्यूज)

कॅन्डल मार्चच्या माध्यमातून क्रांतिसूर्याला आदरांजली
सेलू येथील कार्यक्रम
४ सेलू येथील विकास चौकातील बुद्ध विहारात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी बुद्धवंदना झाली. यानंतर नगर पंचायत सदस्य वैशाली पाटील, अ‍ॅड. राहुल पाटील, सोपान टेंभुर्णे, ताराचंद पोपटकर, अनिल कांबळे, धर्मेंद्र जवादे, पंडीम म्हैसकर, नरेश धनवीज, नवीन पाटील, हनुमंत तेलंग, मधुकर तेलंग, स्रेहल पाटील, सीमा तेलंग, रजनी तेलंग या मान्यवरांसह असंख्य अनुयायांनी बाबासाहेबांना आदरांजली अर्पण केली.
देवळी व पुलगाव
४देवळी येथे बौद्ध समाजबांधवांनी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यासामोर मेणबत्त्या प्रज्वलीत करून अभिवादन केले. खासदार रामदास तडस यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून आदरांजली अर्पण केली. न.प. सभागृहात नगराध्यक्ष शोभा तडस, उपाध्यक्ष विजय गोमासे, माजी नगराध्यक्ष प्रमिला ढोक व गौतम पोपटकर, माला लाडेकर, कृष्णा शेंडे, आदींनी श्रद्धांजली वाहिली. तहसील कार्यालयात तहसीलदार तेजस्विनी जाधव व नायब तहसीलदार महेंद्र सोनोने यांनी महामानवाच्या पुतळ्याला माल्यार्पण करून श्रद्धांजली वाहिली.
४पुलगावात बौद्ध विद्या विहारातून मिरवणूक काढण्यात आली. पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरतोडे यांच्यासह समाजबांधव सहभागी झाले होते. यावेळी विहार समितीचे हरिष नितनवरे, अशोक म्हात्रे, चंद्रकांत वाघमारे यांनी मार्गदर्शन केले.
आष्टी शहर
४आष्टीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अनेकांनी आदरांजली अर्पण केली. अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष बी.टी. उरकुडे, स्मारक समितीचे अध्यक्ष भीमराव गवळी, प्रशीक पाटील, धर्मपाल गवळी प्रामुख्याने उपस्थित होते. नवीन आष्टी येथे पंचशिल ध्वज परिसरात महामानवाला आदरांजली अर्पण करण्यात आली. पं. स. माजी सभापती मोहन ढोले, सरपंच अरुणा गजरे, अ‍ॅड, किशोर मतले, प्रशांत धनविज, राहुल गजरे, घारे यांची उपस्थिती होती. पंचायत समितीमध्ये झालेल्या कार्यक्रमाला सभापती अर्चणा रहाटे, गटशिक्षणाधिकारी विजयकांत दुधे, विस्तार अधिकारी टी.एस. देशपांडे, आर.एच. खान, वैद्यकीय अधिकारी एस.आर रंगारी उपस्थित होते.
समुद्रपूर शहर
४समुद्रपूर येथील बाजार चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आदरांजली अर्पण करण्याकरिता शहरातील नागरिकांची रीघ लागली होती. येथे प्रामुख्याने नगरसेवक राजाभाऊ उमरे, ज्ञानेश्वर वासनिक, माजी उपसरपंच मिलिंद गजभिये, राजू रामटेके संजय गजभिये उपस्थित होते.
हिंगणघाट शहर
४हिंगणघाट येथील विविध वॉर्डातून निघालेल्या कँडल मार्च डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याजवळ पोहचला. या ठिकाणी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली. येथे ३ फुट उंचीची मेनबत्ती जाळण्यात आली. या कार्यक्रमाला प्रलय तेलंग, सुमेध भालशंकर, अमित झामरे, मनोहर शेंदरे, अनिल मून, संजय वानखेडे, अमरदीप बंसोड, महिला मंडळाच्या कांता मानकर, सिमा मेश्राम, आम्रपाली भालशंकर, भोंगाडे, खोब्रागडे गुरूजी आदीसह समाजबांधव उपस्थित होते.
आर्वी शहर
४आर्वी येथील जनता नगर बुद्धविहारात समता सैनिक दलातर्फे कार्यक्रम पार पडला. दलाचे अध्यक्ष सुखदेव नंदागवळी, मुरलीधर सुरवाडे, सुरेंद्र भिवगडे, दर्शना सवई, प्रदीप भिवगडे, शिवदास डुकरे, बाजीराव चोरपगार उपस्थित होते. युवा स्वाभीमानतर्फे तालुकाध्यक्ष दिलीप पोटफोडे यांच्या उपस्थितीत महापरिनिर्वाणदिन कार्यक्रम घेण्यात आला.
कारंजा शहर
४कारंजा येथील विठ्ठल टेकडी परिसरात बुद्धीस्ट एम्प्लॉईज सोसायटी व त्रिरत्न बौद्ध महासंघातर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिन कार्यक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी अमरावतीचे धम्मचारी विमलचंद्र होते. बाबासाहेबांच्या प्रतिमेला माल्यार्पन करून उपस्थित मान्यवरांनी आदरांजली अर्पण केली. याप्रसंगी वर्धेचे प्रा. मनोज लोहे, सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी वासुदेव निकोसे, प्रा. सुभाष गंधारे यांनी बाबासाहेबांचा जीवनपट उलगडला. याप्रसंगी नगर पंचायत अध्यक्ष बेबीताई कठाणे, जि.प.सदस्य कुसूम गजभिये व नगर सेवक प्रेम महिले उपस्थित होते. प्रास्ताविक डी.पी. तागडे, संचालन मंदा नागने व आभार गोवर्धन पाटील यांनी मानले. समाजबांधवांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Web Title: Greetings to the great guests in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.