शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
2
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
3
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
4
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
5
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
6
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
7
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
8
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
9
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
10
Vastu Shastra: प्रगतीचे मार्ग मोकळे करायचे आहेत? मग तुमच्या घरातील 'हे' वास्तू दोष त्वरित दूर करा!
11
पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार?
12
"माझ्यावर हसतोय?" कुर्ल्यात तरुणावर चाकूनं सपासप वार, भररस्त्यात घडलेल्या घटनेनं खळबळ!
13
पुतिन-ट्रम्प यांची फोनवर चर्चा; युरेनियम रशियाला देण्याची ऑफर अमेरिकेने नाकारली! इराणचं टेन्शन वाढलं
14
अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ प्राचीन मूर्ती, अमूल्य ठेव्याची एवढी आहे किंमत 
15
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
16
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
17
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
18
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
19
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
20
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन महत्त्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 05:00 IST

जिल्हा क्रीडा संकुल येथे लेखा व कोषागार विभागाच्या विभागीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी मुरुमकर बोलत होते. अध्यक्षस्थानी लेखा व कोषागार विभागाचे सहसंचालक विजय कोल्हे होते.

ठळक मुद्देदिलीप मुरुमकर : लेखा व कोषागार विभागाच्या स्पर्धा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्पर्धा म्हटले की हार, जीत असणारच. स्पर्धेत जिंकणे महत्त्वाचे नसून खेळाडूंनी त्यांच्यातील उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करणे अधिक महत्त्वाचे आहे. या स्पर्धेत सहभागी खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून आपल्या जिल्ह्याचे नाव करावे. आयोजकांनी हरणाऱ्या खेळाडूलासुद्धा प्रशस्तीपत्र देऊन खेळाचा आणि खेळाडूचा सन्मान करावा, असे विचार जिल्हा प्रमुख व सत्र न्यायाधीश दिलीप मुरुमकर यांनी व्यक्त केले.जिल्हा क्रीडा संकुल येथे लेखा व कोषागार विभागाच्या विभागीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी मुरुमकर बोलत होते. अध्यक्षस्थानी लेखा व कोषागार विभागाचे सहसंचालक विजय कोल्हे होते. उपवनसंरक्षक सुनील शर्मा, जिल्हा कोषागार अधिकारी सूरज बारापात्रे, सदाशिव शेळके, संदीप ओव्हाळ, कोठे, अशोक मातकर, मनोज गोस्वामी, अभिजित मेंगडे, अंडस्कर, मसराम, कोहळे प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी मुरूमकर यांनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत मैदानावर उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केल्याचे सांगितले. खेळाडूंनी या स्पर्धेत मनसोक्त खेळण्याचा आनंद घ्यावा आणि दैनंदिन जीवनातील ताणतणाव घालवावा, असे आवाहनही त्यांनी केले. प्रशासनात काम करताना अनेकदा ताण-तणावात कर्मचारी काम करतात. मानसिक आणि शारीरिक थकवा घालविण्यासाठी अशा क्रीडा महोत्सवाचे आयोजन उपयुक्त ठरते. स्पर्धेत खेळाडूंनी खेळाडूवृत्तीचे प्रदर्शन करून स्पर्धेत यश मिळवावे, असे प्रतिपादन लेखा व कोषागार विभागाचे सहसंचालक विजय कोल्हे यांनी केले. दैनंदिन काम करताना अनेकदा आपापसात झालेले हेवेदावे अशा प्रकारच्या सांघिक आयोजनांमध्ये दूर होतात. जिंकण्याच्या उद्देशाने सर्व कर्मचारी एक टीम म्हणून एकत्र खेळते. असेच टीमवर्क दैनंदिन कामातही ठेवल्यास काम वेळेत पूर्ण करता येते आणि ताणसुद्धा येत नाही. अशीच सांघिक भावना खेळाडूंनी कायम ठेवावी, असे आवाहन कोल्हे यांनी याप्रसंगी केले. उपवनसंरक्षक सुनील शर्मा म्हणाले, आपण कार्यालयात काम करताना बुद्धीचा उपयोग करतो. अशा कार्यक्रमाचे आयोजन केल्यामुळे शारीरिक क्षमतेचा उपयोग करता येतो. त्यामुळे आपल्याला जीवनाचा खरा आनंद घेता येतो. कार्यक्रमाला जिल्हा कोषागार कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन दीपक धाबर्डे व अजय गजभिये यांनी केले. तर आभार सूरज बारापात्रे यांनी मानले.

टॅग्स :Socialसामाजिक