कृतज्ञता रॅलीने दिला ‘पर्यावरण बचाव’चा संदेश

By Admin | Updated: December 8, 2015 03:05 IST2015-12-08T03:05:09+5:302015-12-08T03:05:09+5:30

राष्ट्रवादी कॉँग्रेसच्यावतीने कृतज्ञता वर्ष पाळले जात आहे. याचे औचित्य साधून संपूर्ण आठवडाभर विविध सामाजिक

Gratitude Rally Message of 'Environmental Protection' | कृतज्ञता रॅलीने दिला ‘पर्यावरण बचाव’चा संदेश

कृतज्ञता रॅलीने दिला ‘पर्यावरण बचाव’चा संदेश

वर्धा : राष्ट्रवादी कॉँग्रेसच्यावतीने कृतज्ञता वर्ष पाळले जात आहे. याचे औचित्य साधून संपूर्ण आठवडाभर विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन कण्यात आले आहे. या अनुषंगाने राष्ट्रवादी युवक काँगे्रसतर्फ रविवारी महात्मा गांधी पुतळा ते सेवाग्राम आश्रमपर्यंत कृतज्ञता सायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीतून सहभागींनी वाहनांचा वापर कमी करीत पर्यावरण जतनाचा संदेश दिला.
रॅलीचा प्रारंभ रायुकाँ प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख, रा.कॉ. अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष खलील खतीब, किसान सेलचे अध्यक्ष संजय काकडे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. महात्मा गांधी पुतळ्यापासून प्रारंभ झालेल्या सायकल रॅलीमध्ये पर्यावरण बचाव, पाण्याची बचत करा, स्त्री-भ्रूणहत्या अशा विविध सामाजिक विषयांबाबत कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. सेवाग्राम आश्रममध्ये रॅली पोहोचल्यानंतर प्रथम महात्मा गांधी यांना वंदन करण्यात आले. काही क्षण आश्रम परिसरात विश्रांती केल्यानंतर कार्यकर्त्यांनी परत वर्धेकडे मार्गक्रमण केले.
रॅलीच्या समारोपप्रसंगी समीर देशमुख यांनी प्रदूषणामध्ये होत असलेली वाढ व प्रकृतीवर होणारा दुष्परिणाम लक्षात घेता सर्व जनतेने किमान आठवड्यातून एक दिवस तरी सायकल चालवावी, असे सांगितले.
रॅलीमध्ये जिल्हाध्यक्ष संदीप किटे, रा.वि.कॉ. जिल्हाध्यक्ष राहूल घोडे, पं. स. उपसभापती संदेश किटे, सेलू तालुकाध्यक्ष अर्चित निघडे, संजय शिंदे, कुशाग्र देशमुख, प्रफुल गुल्हाणे, उत्कर्ष देशमुख, संदीप राऊत, संदीप धुडे, सुर्यकांत उगले, प्रणय कदम, सचिन माळोदे, पंकज अनकर, संदीप ठाकरे, संजय नारसे, विवेक तळवेकर, अभिषेक वडतकर, इंजमान खतीब, गुरूदेव मसराम, मोहन काळे, अमित लुंगे, इरफान पठाण यासह कार्यकर्ते सहभागी झाले.(कार्यालय प्रतिनिधी)

सायकल रॅलीच्या माध्यमातून जनजागृतीचा प्रयत्न
४राष्ट्रवादी काँगे्रसच्यावतीने एक आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याच कार्यक्रमांचा भाग म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसद्वारे महात्मा गांधी पुतळा ते सेवाग्राम आश्रमापर्यंत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीच्या माध्यमातून नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जनजागृती व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात आलेत. रॅलीत सहभागींनी पर्यावरण जनजागृतीबाबत घोषणा देण्यात आल्या. शिवाय आठवड्यातून किमान एक दिवस नागरिकांनी सायकल चालविण्याची गरजही व्यक्त करण्यात आली. सायकल रॅलीमध्ये पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Web Title: Gratitude Rally Message of 'Environmental Protection'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.