मुद्रांक विभागाद्वारे नोंदणीसाठी ग्रास ई-चलन प्रणाली सुरू
By Admin | Updated: March 12, 2015 01:32 IST2015-03-12T01:32:24+5:302015-03-12T01:32:24+5:30
मुद्रांक व नोंदणी फी भरण्यासाठी ग्रास या प्रणालीद्वारे थेट ई. चलन भरण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. ज्या दस्ताएवजाची नोंदणी अनिवार्य आहे, ...

मुद्रांक विभागाद्वारे नोंदणीसाठी ग्रास ई-चलन प्रणाली सुरू
वर्धा : मुद्रांक व नोंदणी फी भरण्यासाठी ग्रास या प्रणालीद्वारे थेट ई. चलन भरण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. ज्या दस्ताएवजाची नोंदणी अनिवार्य आहे, अशा सर्व दस्ताऐवजासाठी ई चलन प्रणालीचा वापर करावा, अशी माहिती सह जिल्हा मुद्रांक निबंधक अनुप हांडा यांनी दिली.
ग्रास या प्रणालीवर नोंदणी व मुद्रांक विभागातर्फे स्वतंत्र पेज तयार करण्यात आले आहे. सर्व पक्षकारांना मुद्रांक शुल्क व नोंदणी फी भरण्यासाठी सुविधा उपलब्ध झाली आहे. पूर्वी मुद्रांक शुल्क व नोंदणीसाठी वेगवेगळे चलन बनवावे लागत होते. परंतु नव्या पद्धतीमुळे एकाच चलनाने भरण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. ही पद्धत अचूक असल्यामुळे जनतेला सुलभपणे व अचूक शुल्क भरणे सोईचे होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
ज्या दस्तांची नोंदणी अनिवार्य आहे अशाच दस्तांसाठी ई-चलन सुरू केले आहे. तरीही काही नागरिकांकडून चुकीने अनोंदणीकृत दस्तांसाठी शुल्क-ई-चलनाद्वारे भरले जाते होते. नवीन पेजवर नोंदणीकृत दस्तांसंदर्भातच ई-चलन बनवले जात असल्याने नागरिकांनाच प्रश्नातून योग्य पर्याय निवडावा लागतो. त्यामुळे अनोंदणीकृत दस्तांस ई-चलन तयार होण्याची शक्यता नाही. चलन बनवताना होणाऱ्या तृटीमुळे विभागाकडे परतावा प्रकरणांचे प्रमाण खूपच वाढले होते. नवीन प्रणालीमध्ये या चुका कमी होणार असल्याने नागरिकांना परतावा प्रकरणातील त्रास दूर होऊन अधिक सेवा मिळण्याचे ध्येय पूर्ण होणार आहे. तसेच विभागाची माहिती भरणे अधिक सोपी झाल्याने विभागाशी यापूर्वी संबंध न आलेले नागरिकही याचा फायदा घेऊ शकणार आहे.
मुद्रांक शुल्क व नोंदणी फी एकत्र भरता येणार असल्यामुळे नोंदणी फी साठीची वेगळी चलने कमी होऊन ग्रास प्रणालीवरील ताण कमी होणार असल्याची माहिती सह जिल्हा मुद्रांक निबंधक अनुप हांडा यांनी दिली.(शहर प्रतिनिधी)