आजी-माजी व्हॉलिबॉल पटुंचे स्रेहमिलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 22:50 IST2018-06-11T22:50:32+5:302018-06-11T22:50:42+5:30
क्रीडा संकूलाच्या व्हॉलिबॉल मैदानावर साई स्पोर्टिंग क्लब व जिल्हा व्हॉलीबाल प्रशिक्षण केंद्राच्या संयुक्त विद्यमाने आजी-माजी व्हॉलीबाल खेळाडूंचा स्रेहमिलन व २०१७-१८ मध्ये व्हॉलीबॉल खेळात यश मिळविलेल्या खेळाडूंचा गौरव सोहळा पार पडला. यावेळी यशस्वी खेळाडूंचा खा. रामदास तडस यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

आजी-माजी व्हॉलिबॉल पटुंचे स्रेहमिलन
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : क्रीडा संकूलाच्या व्हॉलिबॉल मैदानावर साई स्पोर्टिंग क्लब व जिल्हा व्हॉलीबाल प्रशिक्षण केंद्राच्या संयुक्त विद्यमाने आजी-माजी व्हॉलीबाल खेळाडूंचा स्रेहमिलन व २०१७-१८ मध्ये व्हॉलीबॉल खेळात यश मिळविलेल्या खेळाडूंचा गौरव सोहळा पार पडला. यावेळी यशस्वी खेळाडूंचा खा. रामदास तडस यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
याप्रसंगी राज्य क्रीडा मार्गदर्शक प्रशांत दोंदळ, श्रीराम गव्हाणे, सुनील साकळे, कमलाकर बनसोड, राजकुमार बारी, रवींद्र काकडे, सुरेश पाचपोर, सुनील आखाडे, सुरेंद्र गांडोळे, दिलीप थाटे, राजेश उमरे आदी उपस्थित होते. १९८२ मध्ये स्थापन साई स्पोर्टींग क्लबला महत्त्वपूर्ण योगदान देणारे राजा देशमुख, चंदू धनुले, नरेंद्र वैरागडे, दिलीप ठोंबरे, सुनील लोहकरे आदी सदस्यांना सन्मानित करण्यात आले. फेब्रुवारी २०१८ मध्ये कोजीकोड (केरळ) येथील वरिष्ठ गट राष्ट्रीयस्तर व्हॉलीबॉल स्पर्धेत महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघाचे प्रतिनिधीत्व करणारा सुरज दवाळे, पोलीस भरतील वर्धा पोलीस दलात निवड झालेला राहुल अधवाल, हर्षद गुजरकर यांचा रेल्वे विभागात निवडीबद्दल, नितेश अनमुलवार व दुर्गा मेसेकर यांनी सातारा येथे झालेल्या २१ वर्षांआतील राज्यस्तर व्हॉलीबॉल स्पर्धेत नागपूर विभागाचे प्रतिनिधीत्व केल्याबद्दल, तनवीर शेख, निखील मोरे, तुषार आंबेकर यांनी पन्हाळा येथील वरिष्ठ गट राज्यस्तर व्हॉलीबाल स्पर्धेत प्रतिनिधीत्व केल्याबद्दल तर पंकज टाकोणे याने मुंबई येथील महा. पोलीस राज्यस्तर व्हॉलीबॉल स्पर्धेत नागपूर रेंज पोलीस संघाचे प्रतिनिधीत्व करीत तृतीय स्थान प्राप्त करून दिल्याबद्दल खा. रामदास तडस यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. शिवाय गुणवंत क्रीडा संघटक पुरस्कारार्थी नितीन घोडे, हर्षल थूल यांचाही गौरव करण्यात आला.
खा. तडस यांनी आॅक्टोबरमध्ये किमान पाच खेळांचा महोत्सव घेण्याचे जाहीर केले. प्रास्ताविक अॅड. श्रीजीत जोशी यांनी केले. संचालन नितीन घोडे यांनी केले तर आभार विवेक बन्सोड यांनी मानले.