गिरड येथे मोहरमनिमित्त भव्य शोभायात्रा
By Admin | Updated: November 1, 2014 23:11 IST2014-11-01T23:11:39+5:302014-11-01T23:11:39+5:30
मोहरमनिमित्त शेख फरीदबाबा दर्गा टेकडीवर आणि साकरबावली येथील दर्ग्याहवर शुक्रवारला सायंकाळी भव्य शाही संदलसह शोभायात्रा काढण्यात आली. हिंदु-मुस्लिम दोन्ही धर्मातील नागरिक मोठ्या

गिरड येथे मोहरमनिमित्त भव्य शोभायात्रा
गिरड/कोरा: मोहरमनिमित्त शेख फरीदबाबा दर्गा टेकडीवर आणि साकरबावली येथील दर्ग्याहवर शुक्रवारला सायंकाळी भव्य शाही संदलसह शोभायात्रा काढण्यात आली. हिंदु-मुस्लिम दोन्ही धर्मातील नागरिक मोठ्या संख्येने या शोभायात्रेत सहभागी झाले होते.
या निमित्त गिरड टेकडीवरील दर्गा, मुख्य प्रवेशद्वार तसेच साकरबावली येथील दर्गा आकर्षक रंगाने आणि आधुनिक रोषनाईने नव्या नवरीसारखा सजला होता. मोहरमनिमित्त साकरबावली दर्ग्याच्या वतीने शाही संदल काढण्यात आले. सायंकाळी ६ वाजता संदल गिरडला आला. यामध्ये बग्गी, आठ घोडे, नागपूरचे बँड पथक होते. रोषणाईही होती. बाबाच्या प्रतिमेला रथावर सजवून गावातील मुख्य मार्ग, बसस्थानक चौक, भारत माता चौक, बाजार चौक, जामा मशिद मार्गे गिरड टेकडीवर नेण्यात आले. दुसरा शाही संदल नागपूर जिल्ह्यातून सिर्सीवरून-गिरडला ७ वाजता पोहोचला. ता. पेठ येथून झेंडा चौक, बाजार चौक, भारत माता, बसस्टँडवरून गिरड टेकडीवर रात्री. १२ वा. तो विसर्जित झाला. हा शाही संदलमध्ये २५ घोडे, १० रथ, डोंगरगावचा बँड पथक, आकर्षक रोषणाई आदींनी परिसर गजबजला होता. परिसरातील हजारो नागरिक या सोहळ्यात सहभागी झाले होते. चौका-चौकात विविध संघटनाच्या वतीने पाणी, सरबत, लंगरची व्यवस्था केली होती.
या शाही संदलसाठी अफसर पठान, करीमुद्दीन काजी, शेख कदीर, रहिम शेख, परवेज काजी, शेख शकील, शेख इसराईल, शमसुद्दीन काजी, नईम काजी, हमिद पटेल, जहीर काजी, रफिक शेख, शफिक पटेल, अशोक गड्डमवार, राजू नौकरकर, मोहन दीक्षित किशोर गाठे, नईम पठाण, प्रेम दीक्षित, शेख राशू, आरीफ काजी, खीली काजी, साहील काजी आदींनी सहकार्य केले. हिंदू-मुस्लीम एकतेचे प्रतीक असलेल्या येथील मोहरम उत्सवाला प्राचीन परंपरा आहे. असंख्य हिंदू बांधव उत्साहात सहभागी होतात. ठाणेदार अनिल जिट्टावार यांनी बंदोबस्त चोख ठेवला होता.(वार्ताहर)