जि.प.समोर ग्रामसेवकांचे धरणे
By Admin | Updated: July 1, 2014 01:38 IST2014-07-01T01:38:24+5:302014-07-01T01:38:24+5:30
ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांच्या वेतन त्रुटी दूर करण्यात आल्या नाही. यामुळे राज्यात ग्रामसेवकांनी सोमवारी धरणे आंदोलन केले. या आंदोलनाने जर मागणी पूर्ण झाली नाही तर काम

जि.प.समोर ग्रामसेवकांचे धरणे
वर्धा : ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांच्या वेतन त्रुटी दूर करण्यात आल्या नाही. यामुळे राज्यात ग्रामसेवकांनी सोमवारी धरणे आंदोलन केले. या आंदोलनाने जर मागणी पूर्ण झाली नाही तर काम राज्यात कामबंद आंदोलन करण्याचा इशारा ग्रामसेवकांनी दिला आहे. या अंतर्गत वर्धेतही जि.प. समोर सोमवारी धरणे देण्यात आले.
राज्यात एकूण २७ हजार ९२७ ग्रामपंचायती असून यात वर्धा जिल्ह्यात ५१७ ग्रामपंचायती आहेत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेची अंमलबजावणी राज्यात ग्रामसेवक संवर्गाने मन लावून केली. राज्यातील ८० टक्के कामे ही ग्रामसेवकांनी केली. असे असताना ग्रामसेवक संवर्गाचे प्रश्न शासन दरबारी वारंवार मांडूनही सुटले नाहीत. ग्रामसेवक संवर्ग ग्रामसेवक ग्राम पंचायत पातळीवर केंद्राच्या, राज्याच्या १३८ योजनेचे काम करतो. गावात ग्रामसेवक ग्राम पंचायत पातळीवर केंद्राच्या, राज्याच्या १३८ योजनेचे काम करतो. असे असतानाही ग्राम सेवकांच्या समस्या सुटत नाहीत. उलट कामाचा ताण आणि व्याप वाढलेला आहे. ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांची वेतनश्रेणी एकच असल्यामुळे त्यांना कालबद्ध पदोन्नतीची लाभ सुद्धा मिळत नाहीत. यामुळे स्थगीत केलेले आंदोलन पुन्हा सुरू करून राज्यात काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.(शहर प्रतिनिधी)