ग्रामसभेतच सदस्यांमध्ये ‘फ्री स्टाईल’
By Admin | Updated: January 28, 2016 02:07 IST2016-01-28T02:07:57+5:302016-01-28T02:07:57+5:30
प्रजासत्ताक दिनी ग्रामसभेपूर्वी जागेच्या वादावरूनच गोंधळ झाला. या गोंधळात झालेल्या फ्रीस्टाईलमध्ये खाली पडल्याने एका ग्रा.पं. सदस्याचा हात फॅक्चर झाला.

ग्रामसभेतच सदस्यांमध्ये ‘फ्री स्टाईल’
एकाचा हात फ्रॅक्चर : दुसऱ्यावर हात उगारल्याचा आरोप
तळेगाव (श्या.पं.) : प्रजासत्ताक दिनी ग्रामसभेपूर्वी जागेच्या वादावरूनच गोंधळ झाला. या गोंधळात झालेल्या फ्रीस्टाईलमध्ये खाली पडल्याने एका ग्रा.पं. सदस्याचा हात फॅक्चर झाला. विरोधी गटाच्या पुरूष सदस्यावर हात उगारण्याचा प्रकारही घडला. ग्रा.पं. च्या इतिहासात प्रथमच असा प्रकार घडला असावा, अशी संतप्त भावना ग्रामस्थ व्यक्त करीत होते.
बुधवारी दुपारी २ वाजता ग्रा.पं. च्या वाचनालयात ग्रामसभा घेण्याचा निर्णय सत्ताधारी गटाने घेतला. ही सभा समोरील प्रांगणात घ्यावी, असे लेखी निवेदन तीन दिवसांपूर्वी विरोधी सदस्याने दिले होते; पण वेळेपर्यंत प्रांगणात सभा न घेण्याच्या निर्णयावर ग्रा.पं. ठाम राहली व सभागृहात ग्रामस्थांची गर्दी वाढल्याने तू-तू मै-मै सुरू झाली. यातच राहुल गाडापेले नामक सदस्याचा खाली पडून हात फॅक्चर झाला तर सचिन गावंडेवर हात उगारला, असे प्रत्यक्षर्शींनी सांगितले. यास गावंडे यांनी दुजोरा दिला. हा प्रकार दुर्दैवी असून सरपंच सुनीता जोरे यांनी पदाची गरीमा सांभाळावी व ग्रामस्थांना हक्क मिळवून द्यावा, असे गावंडे यांनी सांगितले.(वार्ताहर)