ग्रा.पं. कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ
By Admin | Updated: November 21, 2015 02:33 IST2015-11-21T02:33:15+5:302015-11-21T02:33:15+5:30
दिवाळीसारखा सण असतानाही शासनाने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकरिता दिलेले अनुदान पंचायत समितीत अडल्याने सेलू तालुक्यातील कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात गेली.

ग्रा.पं. कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ
कर्मचारी संघटनेचे पं.स.ला निवेदन
सेलू : दिवाळीसारखा सण असतानाही शासनाने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकरिता दिलेले अनुदान पंचायत समितीत अडल्याने सेलू तालुक्यातील कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात गेली. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याने याबाबत ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेद्वारे पंचायत समितीला निवेदन सादर करण्यात आले.
पळसगाव (बाई), परसोडी, बाभुळगाव, आकोली, घोराड, खापरी, रमना, मोर्चापूर, येथील ग्रामपंचायत कर्मचारी किमान वेतन अनुदानापासून वंचित आहे. शासनाचे १००, ७५, ५० टक्के याप्रकरणे अनुदान जिल्हा परिषद कडून पंचायत समितीला प्राप्त झाले. पण, पंचायत समितीने संबंधित ग्रामपंचायतका ते पाठविले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर आलेली उपासमारीची वेळ पाहता सेलू तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी गुरूवारी पंचायत समिती कार्यालयात धडकले. पण गटविकास अधिकारी मिटिंगसाठी गेल्या असल्याने त्यांनी सहाय्यक गट विकास अधिकारी यांना हे अनुदान ग्रा. पं. ला त्वरित पाठविण्याबाबतचे निवेदन दिले २१ नोव्हेंबर पर्यंत हे अनुदान न मिळाल्यास पंचायत समिती कार्यालयापुढे सदर कर्मचारी उपोषणास बसणार असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी संघटनेचे जिल्हा सचिव अनिल भोगे, तालुकाध्यक्ष कवडू फटींग, सचिव प्रशांत रहागडाले, सुभाष द्रुगवार, अनंता नेहारे, विनोद बावणे, मोहनसिंग यादव, दिवाकर माहुरे, पंकज रहाटे यासह इतरही कर्मचारी यावेळी उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)