राज्यपाल शनिवारी बापू कुटीत तर राष्ट्रपती ६ ला सेवाग्रामला येणार

By अभिनय खोपडे | Published: June 21, 2023 04:20 PM2023-06-21T16:20:20+5:302023-06-21T16:22:23+5:30

जिल्हा प्रशासनाची तयारी संदर्भात बैठक

Governor Ramesh Bais to visit Bapu Kuti on june 24th and the President Draupadi Murmu will come to Sevagram on july 6th | राज्यपाल शनिवारी बापू कुटीत तर राष्ट्रपती ६ ला सेवाग्रामला येणार

राज्यपाल शनिवारी बापू कुटीत तर राष्ट्रपती ६ ला सेवाग्रामला येणार

googlenewsNext

वर्धा : महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस हे २३ जूनपासून विदर्भाच्या दौऱ्यावर येत आहेत. २४ जून रोजी शनिवार ते सेवाग्राम येथील बापू कुटीला भेट देणार आहेत.

राज्यपाल पदावर विराजमान झाल्यानंतर त्यांची ही पहिलीच भेट वर्धा जिल्ह्याला आहे. दुपारी ३:३० वाजता ते सेवाग्राम येथे दाखल होणार असून, त्यानंतर ते सेवाग्राम आश्रमाला भेट देतील. ४:३० वाजेपर्यंत ते सेवाग्रामला राहणार असून यावेळी ते आश्रमाच्या विविध उपक्रमांची माहिती जाणून घेतील. याशिवाय ६ जुलै रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही सेवाग्रामला भेट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्या ५ जुलै रोजी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे येणार आहे. त्यानंतर त्या वर्धा येथील आंतरराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यालयाला भेट देतील व सेवाग्राम आश्रमालाही भेट देतील, याबाबत जिल्हा प्रशासनाची तयारी संदर्भात बैठक पार पडली.

Web Title: Governor Ramesh Bais to visit Bapu Kuti on june 24th and the President Draupadi Murmu will come to Sevagram on july 6th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.