‘नागपूर-वर्धा टुरिझम कॉरीडॉर’ला शासनाची हिरवी झेंडी

By Admin | Updated: August 24, 2015 02:09 IST2015-08-24T02:09:30+5:302015-08-24T02:09:30+5:30

विदर्भामध्ये पर्यटनाचे जाळे विकसित करण्याच्या दृष्टीने जनहित मंच ने महाराष्ट्र शासनापुढे वर्धा जिल्ह्यातील उत्तर पूर्वेचा भाग तर नागपूर जिल्ह्यातील उत्तर पश्चिम भाग ....

The government's flagship flagship 'Nagpur-Wardha Tourism Corridor' | ‘नागपूर-वर्धा टुरिझम कॉरीडॉर’ला शासनाची हिरवी झेंडी

‘नागपूर-वर्धा टुरिझम कॉरीडॉर’ला शासनाची हिरवी झेंडी

वर्धा : विदर्भामध्ये पर्यटनाचे जाळे विकसित करण्याच्या दृष्टीने जनहित मंच ने महाराष्ट्र शासनापुढे वर्धा जिल्ह्यातील उत्तर पूर्वेचा भाग तर नागपूर जिल्ह्यातील उत्तर पश्चिम भाग हा वनसंपदा वनसंपदा व जलसाठ्यांनी व्यापलेला भाग नागपूर वर्धा टुरिझम कॉरीडॉर हा महत्वाकांक्षी प्रकल्प सादर केला आहे. त्यांच्या या प्रकल्पाला शासनाच्यावतीने हिरवी झेंडी देण्यात आल्याची माहिती जनहित मंचचे सचिव डॉ. राजेश आसमवार यांनी रविवारी पत्रपरिषदेत दिली.
हा भाग नैसर्गिक दृष्ट्या परिपूर्ण असून वर्धा नदीने वेढलेला व सातपुडा पर्वतरांगेतील वन संपदेने नटलेला आहे. महाकाली धरण, बोर धरण, मदन धरण, कान्होलीबारा धरण असे मोठे व छोटे जलसाठे, तसेच बोर अभयारण्य व व्याघ्र प्रकल्पासह वन्य पशु पक्षी, झाडेझुडपे व वृक्षांनी घनदाट असलेला पर्यटन विकासाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. यासाठी जनहित मंच वर्धाच्या नागपूर वर्धा टुरिझम कॉरीडॉर या प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. याची राज्य शासनाने विशेष दखल घेवून सकारात्मक पाऊल उचलले विदर्भासाठी तो लाभदायी ठरणार आहे.
कवडस कान्होली बारा ते श्री क्षेत्र महाकाळीपर्यंत संपूर्ण भाग नागपूर वर्धा टुरिझम कॉरीडॉर म्हणून विकसित करण्यात यावा, यासाठी जनहित मंच वर्धाने स्थानिक आमदार डॉ. पंकज भोयर यांच्याशी सदर प्रस्तावाबाबत चर्चा केली. आमदारांच्या सहकार्याने सदर प्रस्ताव २०१४ च्या नागपूर हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर करण्यात आला होता. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव यांनी ६ फेब्रुवारी २०१५ ला संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देत प्रस्तावाबाबत तात्काळ अहवाल मागवून घेतला. महाराष्ट्र राज्याचे पर्यटन धोरण आखतांना स्थानिक आमदारांनी या प्रस्तावाला शासन दरबारी उचलुन धरले व जनहित मंचच्या महत्त्वाकांक्षी प्रस्तावाला गती देण्यात आली.
या प्रस्तावाबाबत सखोल माहिती घेण्यासाठी शासनाच्यावतीने मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव अरूण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली जनहित मंचचे डॉ. राजेश आसमवार, सतीश बावसे, सुभाष पाटणकर, प्रशांत कावरवे, आमदार डॉ. पंकज भोयर, आमदार समीर कुणावार, आमदार समीर मेघे, आमदार अनिल सोले तसेच सचिव, सिंचन विभाग, सचिव, वनविभाग, सचिव, पर्यटन विभाग, सचिव, आदिवासी विभाग. एम.टी.डी.सी.चे मुख्य संचालक व पदाधिकारी यांची मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीला नागपूर कलेक्टर व वर्धा कलेक्टर यांना व्हीडीओ कॉन्फरसिंगद्वारे जोडल्या गेले होते. या बैठकीत ज्या अडचणी समोर येत होत्या. त्या तात्काळ दूर करून हा प्रोजेक्ट त्वरीत मार्गी लावा अशा सूचना वजा आदेश अरूण परदेशी यांनी संबंधीत सचिवांना व अधिकाऱ्यांना दिले.
शासनाने उचललेल्या सकारात्मक पावलाने वर्धा व नागपूर येथील अधिकारी कामी लागले असून नागपूर वर्धा टुरिझम कॉरीडॉर प्रकल्पाला व्यापक गती मिळालेली आहे. विदर्भ विकासाच्या दृष्टीने जनहित मंचने तयार केलेला सदर प्रकल्प शासनाच्यावतीने साकार होण्याची चिन्हे असल्याचे सांगण्यात आले आहे.
यावेळी आ. डॉ. पंकज भोयर यांच्रूासह मंचाचे सुभाष पाटणकर, अनुपकुमार भुतडा, प्रमोद गिरडकर, प्रशांत वकारे, डॉ. अरविंद घोंगडे, आर्की, अलोक बेले, भास्कर पारखी, नंदु नरोटे, डॉ. सतीश हरणे, डॉ. जयंत मकरंदे, प्रशांत लांबट, डॉ. रमेश तन्नीरवार, हरिष जोतवाणी, प्रा. दिनेश चन्नावार, डॉ. दिनकर पुनसे, नरेश चांडक, सचिन धांदे, प्रशांत सोईतकर याच्यासह मंचाचे पदाधिकारी व सदस्यांची उपस्थिती होती.(प्रतिनिधी)

Web Title: The government's flagship flagship 'Nagpur-Wardha Tourism Corridor'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.