शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
3
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
4
Shubham Dubey : सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन तो IPL स्टार कसा बनला?
5
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
6
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
7
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
8
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
9
Sandeepa Virk : "दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
11
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
12
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
13
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
14
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
17
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
18
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
19
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
20
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
Daily Top 2Weekly Top 5

कुंभमेळ्यासारख्या धार्मिक आयोजनांवर शासकीय खर्च अनाठायी

By admin | Updated: August 21, 2015 02:36 IST

भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. अनेक धर्म आणि परंपरा येथे एकत्र नांदतात. भारतीय राज्यघटनेने धर्माधारित व्यवस्थेला कुठलेही महत्त्व न देता धर्मनिरपेक्ष राष्ट्राची संकल्पना मान्य केली आहे.

१४ व्या राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेचा सूर : खुल्या गटात ३७ तर शालेय गटात ३५ स्पर्धकांचा सहभागआर्वी : भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. अनेक धर्म आणि परंपरा येथे एकत्र नांदतात. भारतीय राज्यघटनेने धर्माधारित व्यवस्थेला कुठलेही महत्त्व न देता धर्मनिरपेक्ष राष्ट्राची संकल्पना मान्य केली आहे. यामुळे देशातील जनतेने करापोटी शासनाकडे गोळा केलेला जनतेचा पैसा शासनाद्वारे कुंभ मेळाव्यासारख्या धार्मिक आयोजनावर खर्च करणे अनाठायी आहे. त्याचे समर्थन करता येणे कदापि शक्य नाही, असा सूर वादविवाद स्पर्धेतून उमटला.स्थानिक आशीर्वाद मंगल कार्यालयात एनएसयुआयतर्फे दरवर्षीप्रमाणे स्व. आ.डॉ. शरद काळे स्मृती राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धा घेण्यात आली. ही १४ वी राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धा होती. राज्याच्या विविध भागातून सहभागी झालेल्या स्पर्धकांनी आपले विचार व्यक्त केले. ‘भारतीय संस्कृतीच्या एकात्मतेचे दर्शन घडविणाऱ्या कुंभमेळा सारख्या धार्मिक आयोजनावर शासनाद्वारे होणारा कोट्यवधीचा खर्च अनाठायी नसून योग्य आहे’, हा या वादविवाद स्पर्धेच्या खुल्या गटाचा विषय होता. खुल्या गटाचे परीक्षण प्रा. अनिल कवरासे, प्रा. खडसे, सुनीता कदम यांनी केले. शालेय व खुल्या अशा दोन गटात झालेल्या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्रा. मोरेश्वर देशमुख तर उद्घाटक म्हणून प्रा. डी.जे. नांदूरकर उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून पोलीस निरीक्षक शैलेष साळवी उपस्थित होते. शालेय गटाचा विषय ‘शालांत परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची त्याच सत्रात पुन्हा परीक्षा घेण्याचा शासन निर्णय योग्य आहे’ हा होता. शालेय गटाचे परीक्षण मोकदम, ताजनेकर व नाखले यांनी केले.शालेय गटात ३५ तर खुल्या गटात ३७ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेच्या समारोपिय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. अमर काळे तर अतिथी म्हणून बडनेरा विधानसभा मतदार संघाचे आ. रवी राणा, अ.भा. श्री गुरूदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी प्रकाश महाराज वाघ उपस्थित होते. आ. काळे यांनी भारताच्या सांस्कृतिक परंपरा व त्यातून साकारलेलया एकात्मतेमुळेच हे राष्ट्र उभे आहे. जगाला गुरूस्थानी असल्याचा उल्लेख करून आपल्याला चांगल्या परंपरांचा अंगिकार करावा. वाईट परंपरांना मुठमाती द्यावी. सर्वच क्षेत्रात असलेला भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी तरुणांनी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले. आ. रवी राणा, प्रकाश महाराज वाघ यांनीही विचार व्यक्त केले. सलग आठ तास चाललेल्या स्पर्धेला आर्वी व परिसरातील श्रोते उपस्थित होते. संचालन प्रफुल क्षीरसागर यांनी केले तर आभार एनएसयुआय अध्यक्ष अंगद गिरधर यांनी मानले. स्पर्धेला एनएसयुआय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.(तालुका प्रतिनिधी)