शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
2
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
3
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
4
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
5
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
6
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
7
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
8
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
9
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
10
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
11
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
12
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
13
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
14
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
15
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
16
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
17
सातपाटी किनाऱ्यावर १७ वर्षीय मुलाचा समुद्रात बुडून मृत्यू, पाच मित्र बचावले!
18
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
19
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
20
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...

शासनाने गवंडी कामगारांच्या हिताचे धोरण निश्चित करावे

By admin | Updated: June 24, 2015 02:24 IST

गवंडी कामगारांचे सद्यस्थितीत अनेक प्रश्न आहेत. मिस्त्री, मजूर व ठेकेदार यांना पुरेसे काम मिळत नसल्याने त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

समुद्रपूर : गवंडी कामगारांचे सद्यस्थितीत अनेक प्रश्न आहेत. मिस्त्री, मजूर व ठेकेदार यांना पुरेसे काम मिळत नसल्याने त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने गवंडी कामगारांच्या हिताचे धोरण निश्चित करून त्यांना दिलासा द्यावा असे प्रतिपादन कृ.उ.बा.स. समुद्रपूरचे सभापती हिंमत चतुर यांनी केले. समुद्रपूर येथे गवंडी मजूर युनियनच्यावतीने जिल्हास्तरीय मेळावा घेण्यात आला. यावेळी कामगारांच्या हक्कांवर चर्चा करण्यात आली. यानंतर बोलताना रिपाइं नेते विजय आगलावे यांनी समायोचित मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे प्रा. मेघश्याम ढाकरे, निरंजन मेढे, प्रशांत रामटेके यांची उपस्थिती होती.गवंडी कामगारांच्या विकासासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासनाने मदतीचा हात देवून शासनाच्या प्रत्येक कामात स्थानिक कामगारांना सहभागी करून घ्यावे, त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, असे मत निरंजन मेंढे यांनी मांडले. शासनाच्या कामगार कल्याण धोरणांतर्गत विविध योजनांचा लाभ गवंडी कामगारांना मिळावा, प्रशासनाने गवंडी कामगारांसाठी जिल्हावार आराखडा तयार करून बांधकामांची संधी स्थानिकांना प्राधान्याने देण्याची योजना राबवावी, असे विचार मान्यवरांनी मांडले. संचालन आशिष अंड्रसकर यांनी केले तर आभार संजय गिरोले यांनी मानले. यानंतर समुद्रपूर शाखेची कार्यकारिणी गठित केली. यात तालुकाध्यक्ष संजय गिरोले, उपाध्यक्ष अरुण सुरपाम, सचिव नंदू दारुनकर यांच्यासह सदस्यपदी मनोज मून, राजू भगत, अशोक उईके, रतन शेंडे, मारोती बावणे, गुलाब रोकडे, शरद नवघरे, रमेश चावरे, दशरथ ठोंबरे, प्रवीण वाघमारे, मारोती गुंडे यांचा समावेश आहे. यावेळी जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी शरद रामटेके, नत्थुजी दरोडे, गजानन मारबते, रामभाऊ गणवीर आदींनी सहकार्य केले.(तालुका प्रतिनिधी)