शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

येळाकेळी येथील १३ खाणपट्टे शासनजमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 06:00 IST

सेलू तालुक्यातील येळाकेळी येथील टेकडीवर मोठ्या प्रमाणात खाणपट्टे असून तेथे अवैधरीत्या गौणखनिज उत्खनन सुरू होते. येथील १३ खाणपट्ट्यांची मुदत २०१७-१८ मध्ये संपली होती. शासनाच्या नवीन धोरणानुसार या खाणपट्टयांचे नूतनीकरण करणे शक्य नसल्याने नव्याने लिलाव करण्याकरिता सर्व खाणपट्टे शासन जमा करण्याचे निर्देश खाणपट्टे मालकांना देण्यात आले होते.

ठळक मुद्देमहसूल विभागाची कारवाई : १३ क्रशर मशीनसह २ हजार ब्रास गिट्टी जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : प्रशासनाकडून येळाकेळी येथील खाणपट्टेधारकांना वारंवार नोटीस बजावूनही खाणपट्टे शासन जमा न करता अवैध उत्खनन सुरूच ठेवले. त्यामुळे गुरुवारी महसूल विभागाने कारवाई करीत १३ खाणपट्टे शासन जमा केले. तसेच १३ क्रशर मशीनसह २ हजार ब्रास गिट्टी जप्त करण्यात आली. दिवसभर चाललेल्या या कारवाईमुळे खाणपट्टे मालकांचे धाबे दणाणले आहे.सेलू तालुक्यातील येळाकेळी येथील टेकडीवर मोठ्या प्रमाणात खाणपट्टे असून तेथे अवैधरीत्या गौणखनिज उत्खनन सुरू होते. येथील १३ खाणपट्ट्यांची मुदत २०१७-१८ मध्ये संपली होती. शासनाच्या नवीन धोरणानुसार या खाणपट्टयांचे नूतनीकरण करणे शक्य नसल्याने नव्याने लिलाव करण्याकरिता सर्व खाणपट्टे शासन जमा करण्याचे निर्देश खाणपट्टे मालकांना देण्यात आले होते. याकडे त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून अवैधपणे उत्खनन सुरूच ठेवले. दरम्यानच्या कालावधीत जिल्हा प्रशासनाकडून नोटीसही बजावण्यात आल्या पण; त्यालाही खाणपट्टे मालकांनी केराची टोपली दाखविली. त्यामुळे गुरुवारी उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांच्या नेतृत्वात वर्धा व सेलू येथील तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठ्यांच्या उपस्थितीत येळाकेळी येथे कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान तेराही खाणपट्ट्यांचा ताबा घेण्यात आला. तसेच गिट्टी क्रशरच्या १२ मशीन आणि दोन हजार ब्रास गिट्टी जप्त करण्यात आली. सर्व विद्युत पुरवठाही खंडित करण्यात आला. या कारवाईत सेलू येथील तहसीलदार महेंद्र सोनवणे, वर्ध्याच्या तहसीलदार प्रीती डुडुलकर, जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. इम्रान शेख व महावितरणचे अभियंता उपस्थित होते.खाणपट्टे मालकांकडून केली जाणार दंडवसुलीयेळाकेळी येथील खाणपट्ट्यांची मुदत २०१७-१८ मध्येच संपल्याने नूतनूकरण केले नसतानाही मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या उत्खनन सुरु होते. त्यामुळे आता महसूल विभागाकडून मुदत संपल्यापासून किती उत्खनन केले याबाबत इटीएसद्वारे मोजणी केली जाणार आहे. त्यानंतर जितके ब्रास अवैध उत्खनन केले तेवढा दंडही या खाणपट्टे मालकांकडून वसूल केल्या जाणार आहे. त्यामुळे आता या कारवाईने खदान मालकांना चांगलाच आर्थिक फटका बसणार आहे.येळाकेळी येथील १३ क्रशर मशीनसह २ हजार ब्रास गिट्टी जप्त करण्यात आली आहे. मशिनीला सिल करीत जप्त केलेल्या गिट्टीच्या सभोवताल चुन्याने आखणी केली आहे. येथील गिट्टीची उचल किंवा मशिनचे सिल काढण्याचा प्रयत्न केल्यास गुन्हा दाखल केला जाईल. तसेच त्याला काळ्या यादीत टाकून पुन्हा खाणव्यवसाय करता येणार नाही.सुरेश बगळे, उपविभागीय अधिकारी, वर्धा.