शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

शासनाला आश्वासनांचा विसर

By admin | Updated: November 13, 2015 02:03 IST

किसान अधिकार अभियानमार्फत शासन प्रशासनाच्या धोरणांविरूध्द बंड पुकारण्याचे बळ एकवटण्यासाठी ‘बळी महोत्सव’ २४ तास आत्मक्लेश ...

बळी महोत्सव कार्यक्रम : किसान अधिकार अभियानचा आरोप वर्धा : किसान अधिकार अभियानमार्फत शासन प्रशासनाच्या धोरणांविरूध्द बंड पुकारण्याचे बळ एकवटण्यासाठी ‘बळी महोत्सव’ २४ तास आत्मक्लेश आत्मिंचतन आंदोलन बजाज चौक येथे राबविले. अभियानचे मुख्य प्रेरक अविनाश काकडे यांच्यासह जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते, सहकारी मित्र व शहरातील संवेदनशील, पुरोगामी संघटनाच्या कार्यकर्त्यांनी यात सहभाग नोंदविला. शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, दलीत व आदिवासी जनतेला शासनाच्या चूकीच्या धोरणांमुळे व प्रशासनातील संगठीत असंवेदनशील मूठभर उच्च पदस्थ नोकरशाहांच्या नकारात्मक वृत्तीमुळे सतत शोषणाचे बळी होत असलेल्या बळी राजाच्या वारसांचा, शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा व ग्रामीण भागातील धान्याच्या निर्मितीचा, लक्ष्मीचा आगमनाचा उत्सव हे बहुसंख्य बहुजन बांधवांच्या जीवनात साजरा करू शकत त्यांच्या समवेदना अनुभवण्यासाठी सदर आंदोलन असल्याचे सांगण्यात आले. या कार्यक्रमातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाची भूमिका काकडे यांनी व्यक्त केली. येत्या हिवाळी अधिवेशनात शासनाला त्यांनी निवडणुकीच्या आधी शेतकऱ्यांना दिलेल्या वचननाम्याची वचनपूर्ती करा, असा आग्रह धरण्यात येणार असल्याचे सांगितले. निवडणुकीच्या काळात दिलेले एकही वचन राज्यकर्त्यांनी पाळले नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. किसान अधिकार अभियानचे मार्गदर्शक श्रीकांत बारहाते यांनी शासनाचे शोषित वर्गाकडे होत असलेले दुर्लक्ष हे जाणीवपुर्वक असून शेतकरी-शेतमजूर हा त्यांच्या विकासाच्या दृष्टीक्षेत्रातील समाज नाही. आपल्याला सरकारपुढे ठामपणे आपल्या असण्याची जाणीव आंदोलनामधून करून द्यावी लागणार आहे, असे मत व्यक्त केले. प्रा. नुतन माळवी यांनी बळीमहोत्सव कार्यक्रमाची भूमिका विषद केली. या बळीमहोत्सवात आपण संघर्ष व शिक्षणाचा संकल्प करण्यासाठी एकत्र येत असल्याची माहिती उपस्थितांना दिली. या कार्यक्रमात बळीराजा गौरव सन्मान किन्ही (आष्टी) येथील राणी दुर्गावती दारूबंदी महिला मंडळ व सामाजिक कार्यकर्त्या डॉ. ज्योति लुंगे यांना गौरवान्वीत करण्यात आले. २४ तास आत्मक्लेश, आत्मचिंतन बळीमहोत्सव कार्यक्रमाचे संचालन किसान अधिकार अभियानचे जिल्हाध्यक्ष सुदाम पवार यांनी केले. यावेळी झालेल्या खुल्या चर्चेत अभियानचे पदाधिकारी व विविध पुरोगामी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सहभागी होत चर्चा केली. कार्यक्रमाकरिता सर्वांनी सहकार्य केले.(प्रतिनिधी)राज्य शासनाचा वचननामा शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा कमीत कमी ५० टक्के जास्त नफ्याची खात्री मिळेल अशी योजना आखण्यात येईल. स्वस्त दरात शेती साधनांची व निविष्ठांची उपलब्धता करून देवू, कमी दरात शेती पीक कर्जाची उपलब्धता शेतकऱ्यांना करून देवू, जिल्ह्यात जास्त उत्पादन देणाऱ्या बियाण्यांच्या संस्कारक्षम प्रयोगशाळा. धान्य साठवणूक केंद्राची निर्मिती, शेती विमा योजना अंमलात आणू. प्रत्येक जिल्ह्यात फिरती माती परिक्षण प्रयोगशाळांची निर्मिती करू. जमीन वापरासाठी राष्ट्रीय नीती आखू व अमलात आणू. पंतप्रधान ग्रामसिंचन योजनेच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याच्या शेताला पाणीपुरवठा देवू यातील एकही वचन पूर्ण झाले नाही.