शासकीय कर्मचारी मार्गदर्शन मेळावा
By Admin | Updated: November 8, 2014 01:38 IST2014-11-08T01:38:06+5:302014-11-08T01:38:06+5:30
फुड कार्पोरेशन आॅफ इंडिया वर्कर्स युनियनच्यावतीने एफसीआय सभागृहात कामगार, कर्मचारी मार्गदर्शन मेळावा पार पडला.

शासकीय कर्मचारी मार्गदर्शन मेळावा
वर्धा : फुड कार्पोरेशन आॅफ इंडिया वर्कर्स युनियनच्यावतीने एफसीआय सभागृहात कामगार, कर्मचारी मार्गदर्शन मेळावा पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय खाद्य निगमचे डेपो प्रमुख नितीन सोनी होते तर प्रमुख अतिथी म्हणून व्यवस्थापक मनोज वर्मा, सरदार शेषराव बिहारे, गोदाम प्रमुख एस. एन. पाटील, श्रमविभाग प्रमुख त्र्यंबक किर्तीवार, संघटक रामा पौळ, आॅल इंडिया युनियन प्रतिनिधी रवी गणवीर, विजय भगत, अवधेश रॉय, आनंदा खिल्लारे यांची उपस्थिती होती.
मेळाव्याचे उद्घाटन आॅल इंडिया संघटन सचिव राजू फुके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना फुके यांनी सांगितले की, सर्व जातीधर्माचे लोक एकत्र काम करीत आहेत. अनेक वर्षापासून अंग मेहनतीचे कामे केली जात असल्याने शरीर हे थकणार, त्यामुळे कामगारांनी, अधिकाऱ्यांनी समन्वय ठेवून शासकीय कामे पूर्ण करावी, असा सल्ला दिला.
कामगारांच्या कोणत्याही अडचणी व समस्या असल्यास याची माहिती द्यावी, प्रत्येक कामगाराला न्याय देण्याकरिता प्रयत्न केला जाईल, असे आवाहन गणवीर यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन प्रशांत हुमणे यांनी केले तर आभार अरूण भस्मे यांनी मानले. यावेळी उपस्थितांचे मार्गदर्शन झाले.
मेळाव्याला सुधाकर येरणे, संजय भालेकर, विनोद देवढे, मंगेश येरणे, बाबाराव देढे, अनिल शेंडे, राम वाघमारे, उत्तम तराळे, श्रावण शोलार, दिपक येरणे, इब्राहीम शेख, प्रदीप रामटेके, राजू वासनिक, बाबाराव वानखेडे, किशोर सोनवने, राजू क्षीरसागर, भाऊ रक्षक, नामदेव कपाट, महेश बडेरे आदींनी सहकार्य केले.
यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत कामगारांच्या मागण्या, समस्या यावर चर्चा केली.(स्थानिक प्रतिनिधी)