शासकीय दस्तऐवजांची बॅग केली परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 01:26 IST2018-04-09T01:26:46+5:302018-04-09T01:26:46+5:30
शालिमार एक्सप्रेस वर्धा रेल्वे स्थानकावर पोहोचली असता आशिष खंडारकर नामक व्यक्तीला एक बॅग रेल्वेत सापडली. त्यांनी त्या बॅगची तपासणी केली असता त्यात राळेगाव भूमि अभिलेख कार्यालयातील महत्त्वाचे दस्तावेज असल्याचे दिसून आले.

शासकीय दस्तऐवजांची बॅग केली परत
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शालिमार एक्सप्रेस वर्धा रेल्वे स्थानकावर पोहोचली असता आशिष खंडारकर नामक व्यक्तीला एक बॅग रेल्वेत सापडली. त्यांनी त्या बॅगची तपासणी केली असता त्यात राळेगाव भूमि अभिलेख कार्यालयातील महत्त्वाचे दस्तावेज असल्याचे दिसून आले. सदर बॅग खंडारकर यांच्या प्रयत्नाने तेथील कर्मचाऱ्याकडे पोहोचल्याने अजूनही माणुसकी जिवंत असल्याचे दिसून आले.
सदर बॅगमधील दस्ताऐवजाची पाहणी केली असता ते राळेगाव येथील भूमिअभिलेख कार्यालयाचे असल्याचे दिसून आले. सध्या मार्च एन्डींग असल्याने ही कागदपत्रे महत्त्वाची ठरणारी आहे. ती कार्यालयात जमा झाली नाही तर कुणाची नोकरी जाण्याची शक्यता होती. यामुळे खंडारकर यांनी कागदपत्रांची पाहणी केली असता त्यात त्यांना एक भ्रमणध्वनी क्रमांक मिळाला. त्या क्रमांकावर संपर्क साधत विचारणा केली असता ही बॅग त्यांच्याच कार्यालयातील असल्याचे उघड झाले. यावरून सदर बॅग ‘लोकमत’ जिल्हा कार्यालयात अविनाश पाटील नामक व्यक्तीच्या हवाली करण्यात आली. ही बॅग पाटील यांच्या माध्यमातून त्या कार्यालयापर्यंत पोहोचल्याची खात्री आशिष खंडारकर यांनी केली.