शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

बोर व्याघ्र प्रकल्पालगतच्या गावांच्या सुरक्षेकरिता शासन कटिबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 12:00 AM

आर्वी विधानसभा क्षेत्रातील अनेक गावे बोर व्याघ्र प्रकल्पात आले आहेत. यामुळे या गावातील नागरिकांचा वन्य प्राण्यांच्या हैदोसाचा सामना करावा लागत आहे. हीच समस्या मार्गी लावण्याकरिता माजी आमदार दादाराव केचे यांनी पालकमंत्र्यांना साकडे घातले.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : संबंधित गावे कोअर झोनमध्ये नसल्याने त्यांचे पुनर्वसन अशक्य, तरीही प्रयत्न करणार

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : आर्वी विधानसभा क्षेत्रातील अनेक गावे बोर व्याघ्र प्रकल्पात आले आहेत. यामुळे या गावातील नागरिकांचा वन्य प्राण्यांच्या हैदोसाचा सामना करावा लागत आहे. हीच समस्या मार्गी लावण्याकरिता माजी आमदार दादाराव केचे यांनी पालकमंत्र्यांना साकडे घातले. यावर पालकमंत्र्यांनी या गावांच्या सुरक्षेकरिता शासन कटीबद्व असल्याचे आश्वासन त्यांना दिले.आर्वी तालुक्यातील मेटहिरजी, उमरविहरी, येनिदोडका, मरकसुर, माळेगाव (ठेका), सिंदिविहीरी, सुसुंद व बोरगाव (गोंडी) गावांचा बोर व्याघ्र प्रकल्पांमध्ये समावेश करून या गावांचे पुनर्वसन करण्यात यावे अशी संबधीत गावकऱ्यांची मागणी व गावांच्या समस्यांबाबत निर्णायक भुमिका घेण्याची गरज माजी आमदार दादाराव केचे यांनी महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासमक्ष व्यक्त केली. मनुष्य तथा शेतकऱ्यांना शेती करताना होत असलेल्या त्रासाबद्दलची माहिती माजी आमदार केचे यांनी दिली असता सुधीर मुनगंटीवार यांनी बैठक घेऊन कार्य तत्परतेचे उदाहरण देत त्रस्त झालेल्या कुटुंबाकडे लक्ष वेधले. या बैठकीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे देखील माजी आमदार दादाराव केचे यांनी पाठपुरवठा केला आहे.बोर व्याघ्र प्रकल्पाला लागुन असल्याने वन्य प्राण्यांचा हैदोसाचा त्रास येथील गावकऱ्यांना होत आहे. रोही, रानडुक्कर, वाघ, बिबटे इत्यादी प्राण्यांमुळे गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या गावातील शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांमुळे शेती करणे कठीण झाले आहे. शेती हा मुख्य व्यवसाय असल्याने गावातील आर्थिक स्थिती हलाखीची झाली आहे. शिक्षणाकरिता औषधोपचारासाठी तसेच इतर सर्व महत्त्वाच्या कामासाठी गावकऱ्यांना कारंजा, आर्वी, वर्धा, सेलू येथे जावे लागते. या ठिकाणी पोहचण्यासाठी जंगल परिसरातूनच जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. या सर्व पार्श्वभूमीवर येथील जनजीवन वर्षानुवर्षे प्रभावित झाले आहे.या गावातील जनतेला त्रासांपासून मुक्त करण्यासाठी गावांचे पुनर्वसन जंगल परीक्षेत्राबाहेर करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. त्यामुळे मेटहिरजी, उमरविहरी, येनिदोडका, मरकसुर, धानोली, सिंदिविहीरी, सुसुंद व बोरगाव (गोंडी) या गावाचे पुनर्वसन करण्यात यावे याबाबत माजी आमदार दादाराव केचे यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना प्रकाराचे गांभीर्य लक्षात आणून दिले. ना. मुनगंटीवार यांनी यावेळी सकारात्मक प्रतिसाद देत बैठकीत हजर असलेल्या गावकºयांच्या समस्या जाणून घेत अधिकाऱ्यांना संबंधित बाबीची विचारणा केली असता या गावांचे पुनर्वसन शक्य नसल्याचे सांगितले.या बैठकीला वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह गावातील शिष्टमंडळ उपस्थित होते.उपाययोजना आखण्याकरिता मागितला पाच वर्षांचा आढावादादाराव केचे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात आणून दिल्यानंतर ना. मुनगंटीवार यांनी ही बाब केंद्र सरकारच्या अखत्यारीतील असल्याने अधिकाऱ्यांना गत पाच वर्षातील घटनांचा आढावा मागितला. तसेच ही गावे कोर झोन मध्ये येत नसल्याने या गावांकरिता स्वतंत्र धोरण तयार ग्रामसभेतून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले.तसेच पुनर्वसन होईपर्यंत नुकसान भरपाईचे निकष, जंगल परीसराला उच्च कोटीचे कंपाऊंड, वैज्ञानिक दृष्टिकोनातून या भागातील नागरिकांना संरक्षण मिळावे यासाठी अत्याधुनिक यंत्रणा उभारण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या. शिवाय या विषयावर चर्चा करण्याकरिता ४ जुलैला बैठक आयोजित आहे.

टॅग्स :Bor Tiger Projectबोर व्याघ्र प्रकल्पSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार