खाकीतील देवदूतांसाठी राबताहेत खासदारांच्या सौभाग्यवती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 05:00 AM2020-04-09T05:00:00+5:302020-04-09T05:00:22+5:30

कोरोनामुळे उद्धभवलेली आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता देशभर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग, स्वच्छता विभाग व अंगणवाडी सेविका देवदूताप्रमाणे रस्त्यावर उतरुन इतरांसाठी आपल्या जिवाचे रान करीत आहे. सीमाबंदी व जमावबंदी असल्याने संरक्षणाची आणि बंदोबस्ताची जबाबदारी पोलीस प्रशासनाच्या खांद्यावर आहे. शिवाय ते कर्तव्य बजावत आहे.

Good luck to the Parliamentarians for the angels in Khaki | खाकीतील देवदूतांसाठी राबताहेत खासदारांच्या सौभाग्यवती

खाकीतील देवदूतांसाठी राबताहेत खासदारांच्या सौभाग्यवती

Next
ठळक मुद्देपोलिसांच्या कर्तव्याप्रति कृतज्ञता : दररोज तयार करतात खाद्यपदार्थ, सूपुत्रासह नगरपालिकेचे उपाध्यक्ष तसेच कार्यकर्त्यांचे मिळतेय सहकार्य

आनंद इंगोले।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोनाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत असताना आपले आरोग्य सांभाळण्यासाठी सारेच घरात बसून आहेत. मात्र, पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून समाजासाठी दिवसरात्र रस्त्यावर कर्तव्य बजावत आहे. अशा या देवदूतांच्या पोटाची भूक भागविण्यासाठी खुद्द खा. रामदास तडस यांच्या सौभाग्यवती शोभा तडस यांनी पुढाकार घेतला आहे. मोठेपणा विसरुन दररोज स्वत:च्या हाताने अल्पोहार बनवून तो पोलीसदादांपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था करतात.
कोरोनामुळे उद्धभवलेली आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता देशभर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग, स्वच्छता विभाग व अंगणवाडी सेविका देवदूताप्रमाणे रस्त्यावर उतरुन इतरांसाठी आपल्या जिवाचे रान करीत आहे. सीमाबंदी व जमावबंदी असल्याने संरक्षणाची आणि बंदोबस्ताची जबाबदारी पोलीस प्रशासनाच्या खांद्यावर आहे. शिवाय ते कर्तव्य बजावत आहे. सध्याच्या परिस्थितीत सर्व खानावळी, हॉटेल, चहा कॅन्टीन बंद असल्याने कर्तव्यावरील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अल्पोहार व जेवणाची गैरसोय होत आहे. पोलिसांना आपल्या पोलीस ठाण्यापासून किंवा चौकीपासून दूरवर कर्तव्य बजवावे लागत असल्याने तेथे कोणतीही सोय उपलब्ध नाही. परिणामी त्यांना पाण्याचे घोट गिळून किंवा जवळ असलेल्या खाद्यपदार्थावरच दिवस काढावा लागतो. समाजाच्या रक्षणार्थ पोलिसांचा होणारा पोटमारा लक्षात घेऊन ३१ मार्चपासून खा. तडस यांनी कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या अल्पोहाराची व चहाची व्यवस्था करण्याची जबाबदारी स्वीकारली. तर त्यांच्या सौभाग्यवती, देवळीच्या माजी नगराध्यक्षा तथा गटनेत्या शोभा तडस यांनी ती जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत दररोज अल्पोहार व चहाची व्यवस्था स्वत: करतात. त्यांना नगरपालिकेचे उपाध्यक्ष डॉ. नरेंद्र मदनकर, विभा बजाईत, सुनंदा, जगदंबा यादव सहकार्य करीत आहे. सुपूत्र पंकज तडस यांच्या नियंत्रणात रवी कारोटकर, उमेश कामडी, सुरज कानेटकर, प्रशांत डुकरे हे देवळी तालुक्यातील शिरपूर येथील पोलीस चौकी, अंदोरी येथील पोलीस चौकी, देवळी शहर पोलीस स्टेशन तसेच शिवसेना चौक, बसस्थानक चौक, बाजार चौक, देवळी नाका, ग्रामीण रुग्णालय, नगर परिषद आदी ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांसह इतर कर्मचाºयांनाही दररोज दुपारी अल्पोहार व चहा पोहोचवितात. यामुळे कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनाही मोठा आधार मिळत आहे.

कोरोना विषाणूपासून नागरिकांना सतर्क राहण्यासाठी स्वत:ची तहान-भूक विसरून पोलीस कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी तसेच वैद्यकीय कर्मचारी हे कोरोना योद्धा रस्त्यावर उतरले आहेत. त्यांच्या या कामगिरीप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही सुरु केलेले हे कार्य फार लहान आहे. या निमित्ताने का होईन अशा खºया देवदूतांची सेवा करण्याची एक संधी मिळाली आहे.
- शोभा तडस, माजी नगराध्यक्ष, देवळी

जागतिक आपत्तीच्या काळात जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन व आरोग्य विभाग दिवसरात्र कर्तव्य बजावत आहे. त्यांच्या या कार्याला तोड नाही. सध्या देवळी पोलीस ठाण्यांतर्गत येणाºया सर्व पोलीस कर्मचाºयांसाठी अल्पोहार आणि चहाची व्यवस्था करण्यात आली आहे. आज हनुमान जयंतीपासून वर्धा शहरातील पोलीस कर्मचाºयांना अल्पोहार आणि चहा देण्याचे काम सुरु करण्यात येणार आहे.
- रामदास तडस, खासदार.
 

Web Title: Good luck to the Parliamentarians for the angels in Khaki

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.