शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सोने ८१ हजारांवर, चांदी एक लाखावर; आठवडाभरात चांदीच्या दरात साडेपाच हजारांनी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2024 17:25 IST

Vardha : ग्राहकांत खरेदीसाठी उत्साह कायम

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : अलीकडे केंद्र शासनाने सोने- चांदीत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. इतर देशांनीही सोन्यात गुंतवणूक केल्याने तसेच इराण इस्राइल युद्धाचा भडका उडाल्याने सोन्याचे भाव तेजीत असल्याचे सांगण्यात आले आहे.

सराफा बाजारात सोन्याचे दर जीएसटीसह ८ हजार ६१ रुपयांवर पोहोचले आहे. तर चांदी प्रतिकिलो एक लाख रुपयांवर गेली आहे. वर्षअखेर सोने ९० हजारांच्या घरात सोने जाण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. दिवाळी सणाला सोने खरेदीचा मुहूर्त साधला जातो. २७ तारखेला २४ कॅरेट सोने प्रतितोळा ७८ हजार ८०० रुपये, तर चांदी प्रतितोळा ९७० रुपये एवढा भाव होता. सोमवारी दर घसरून सोने प्रतितोळा ७८ हजार २००, तर चांदी ९६० रुपये दर असल्याचे सांगण्यात आले. 

युद्ध आणि दरवाढीचा संबंध काय?

  • युद्ध आणि भू-राजकीय अशांततेच्या काळात गुंतव- णूकदार सोन्याकडे मूल्याचे एक विश्वासार्ह भांडार म्हणून पाहतात. जे त्यांची संपत्ती टिकवून ठेवू शकतात आणि अधिक मंदीपासून बचाव करू शकतात. यामुळेच जोखमीच्या काळात सोन्याच्या दरात वाढ होते. त्यामुळे त्यांची किंमत वाढते.
  • सौर प्लेटसह औषधांसाठी चांदीचा वापर केला जात आहे. वापरात आलेली चांदी पुन्हा परत येणार नाही. यातून चांदीच्या दरातही मोठी वाढ नोंदविली जात आहे. याचा परिणाम चांदीच्या दरात वाढ होण्यावर झाला असल्याचे सांगण्यात आले आहे

 

युद्धामुळे अस्थिरता वाढली स्थावर मालमत्तेवरील गुंतवणु- कीपेक्षा सोन्यातील गुंतवणूक प्रत्येक गुंतवणूकदारांकडून वाढली आहे. याचा परिणाम सोन्याच्या दरावर झाला आहे, चांदीच्या दरातही कमालीची वाढ नोंदविली आहे. सोमवारी सोन्याचे दर ५०० रुपयांनी कमी झाल. असे असले तरी मागील दहा दिवसांत सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

चांदीचे दर पाच वर्षांत तिप्पट२०१९ पूर्वी चांदीचे दर ४० हजार रुपये किलोच्या घरात होते. मागील पाच वर्षांत चांदीचे दर तिपटीने वाढले आहे. आता एक लाख रुपये किलोच्या घरात चांदी पोहोचली आहे. आजपर्यंत इतिहासातील चांदीच्या दरातील ही सर्वात मोठी वाढ मानली जात आहे. सोन्याच्या दराप्रमाणे चांदीचा वापर वाढला आहे.

"गेल्या काही वर्षांत सातत्याने सोन्याचे दर वाढते आहे. जागतिक युद्धाचा सोन्याच्या दरावर परिणाम होते. दिवाळीच्या मुहूर्ताला सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होते आहे. भविष्यात गुंतवणूक म्हणून नागरिक सोन्याकडे पाहत आहे." - सौरभ ढोमणे, सराफा व्यावसायिक, वर्धा

"यंदा सोने वर्षअखेर ८० हजारांचा टप्पा पार करेल, असा अंदाज होता. मात्र, दिवाळीपूर्वीच सोन्याने हा टप्पा गाठला आहे. वर्षअखेर सोने ८५ हजार पार करण्याचा अंदाज आहे. यंदा धनत्रयोदशीला साधारण १५ टक्क्यांनी जादा सोने खरेदी होण्याची शक्यता आहे." - विपुल करंडे, सराफा व्यावसायिक, वर्धा 

टॅग्स :Goldसोनंwardha-acवर्धा