शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

उरलेल्या शेतजमिनीच्या तुकड्यांचा मोबदला द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 00:05 IST

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी राज्य शासनाने अधिसूचना काढून शेतकऱ्यांच्या शेतजमिनी घेतल्या. पण, अनेक शेतकऱ्यांच्या शेतात तुकडे पडलेले आहे. कायद्यातील तरतुदी प्रमाणे जमिनींच्या त्या तुकड्यांचाही मोबदला द्यावा, अशी मागणी महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने मंगळवारी जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : महात्मा फुले समता परिषदेची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी राज्य शासनाने अधिसूचना काढून शेतकऱ्यांच्या शेतजमिनी घेतल्या. पण, अनेक शेतकऱ्यांच्या शेतात तुकडे पडलेले आहे. कायद्यातील तरतुदी प्रमाणे जमिनींच्या त्या तुकड्यांचाही मोबदला द्यावा, अशी मागणी महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने मंगळवारी जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.महाराष्ट्राच्या महसूल विभागाच्या कायद्यातील तरतुदीप्रमाणे, दीड एकरच्या आत जर भूसंपादन करून शेतजमिनीचा तुकडा पडत असेल तर तो सुद्धा या महामार्गासाठी घेतला जाईल. तसेच त्याचाही याच नियमाप्रमाणे मोबदला दिला जाईल, असे समृद्धी महामार्ग प्राधिकरणाने व शासनाने आश्वासन दिलेले होते. परंतु जमिनींचे अधिग्रहन करतांना शेतजमिनीचे दीड एकर व त्यापेक्षाही कमी आकाराचे तुकडे शिल्लक ठेवले आहे. त्याचे अधिग्रहन करुन मोबदला दिला नाही.या तुकड्यांमध्ये शेतकरी शेती करू शकत नसल्याने शेतकºयांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे हे भूसंपादन केल्यावर राहिलेली दीड एकरपेक्षा लहान शेतजमिनीचे तुकडे सुद्धा त्याच किंमतीत समृद्धी महामार्ग प्राधिकरणाने घ्यावेत. त्याचा मोबदला शेतकºयांना तत्काळ द्यावा, तसेच या शेजमिनीच्या अधिग्रहनामुळे अनेक शेतकरी त्यांची इच्छा नसताना सुद्धा विस्थापित झालेले आहे. त्यामुळे शासनाच्या कायद्यातील तरतुदीनुसार यासर्व शेतकºयांना, प्रकल्पग्रस्त म्हणून प्रमाणपत्र मिळणे गरजेचे आहे. जेणेकरून त्यांना त्यांच्या वारसानांना प्रकल्पग्रस्त शेतकरी म्हणून शासनाच्या विविध सवलतींचा व शासकीय नोकरीमधील समांतर आरक्षणाचा लाभ होऊ शकेल, अशी मागणी महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने करण्यात आली.समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांना सोबत घेऊन मंगळवारला निवासी उपजिल्हाधिकारी उत्तम दिघे यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देताना महात्मा फुले समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष प्रा. दिवाकर गमे, विनय डहाके, अ‍ॅड. महेंद्र धोटे, निळकंठ पिसे, निळकंठ राऊत, विशाल हजारे, श्रीराम चव्हाण, कविता मुंगले, रेखा खेळकर, कवडू बुरंगे, श्रीकांत वंजारी, गंगाधर मुडे, विनायक पावडे, प्रभाकर राऊत, संजय म्हस्के, अरूण कनेरी, शंकर येलोरे, मनोहर गोंदाने, सुभाष भोयर, सुशील झाडे, चंद्रशेखर दाते, सुनील सोमनकर, अविनाश वानखेडे, प्रभाकर वांढेकर, सुरेश तिजारे, श्याम जगताप यांच्यासह समृध्दी महामार्ग बाधित विविध गावातील शेतकरी मोठ्या संख्यने उपस्थित होते. निवेदन दिल्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी दिघे यांच्याशी चर्चा करण्यात आली.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गagricultureशेती