शिक्षकांच्या समस्यांना प्राधान्य देणार
By Admin | Updated: September 18, 2014 23:40 IST2014-09-18T23:40:09+5:302014-09-18T23:40:09+5:30
जि.प. प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी रविंद्र काटोलकर यांना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने विविध मागण्याचे निवेदन सादर केले. यानंतर काटोलकर यांनी शिक्षकांच्या

शिक्षकांच्या समस्यांना प्राधान्य देणार
वर्धा : जि.प. प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी रविंद्र काटोलकर यांना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने विविध मागण्याचे निवेदन सादर केले. यानंतर काटोलकर यांनी शिक्षकांच्या विविध समस्या व प्रलंबित प्रश्नांवर चर्चा केली. प्रलंबित समस्यांना प्राधान्य देऊन सोडविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी प्राथमिक शिक्षण, शिक्षक व विद्यार्थी हितासंबंधिच्या सर्व कार्याविषयी तत्परता बाळगण्यात येईल ते म्हणाले. या चर्चेत शिक्षणाधिकाऱ्यांनी प्राथमिक शाळांची गुणवत्ता व दर्जा टिकवून ठेवत पुढे त्यात वाढ करण्याची कृती शिक्षकांकडून करण्याचे सांगितले. तसेच दोन उच्च श्रेणी मुख्याध्यापक जिथे कार्यरत आहे. त्यातील एकाला दुसऱ्या शाळेत पाठवावे व जास्तीचे विषय शिक्षक कार्यरत आहेत तेथून त्यांना काढून आवश्यक असलेल्या शाळेत देण्यात यावे, शासन निर्णयाप्रमाणे तात्काळ समायोजन करण्यात यावे हा मुख्य व महत्त्वाचा मुद्दा यासह प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
निवेदनात काही प्रमुख मागण्याचा समावेश केला. यात जि.प. प्राथमिक शाळा, खराशी जिल्हा भंडारा या शाळेत अभ्यास दौऱ्यावर जाण्यासाठी परवानगी द्यावी, सप्टेंबर २००० मध्ये लागलेल्या १९७ शिक्षण सेवकांना मंजुर झालेल्या वरिष्ठ श्रेणीची थकबाकी काढणे, नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त शिक्षण सेवकांच्या अंशदायी निवृत्ती वेतन कपातीच्या रकमांचा हिशेब देऊन ती रक्कम त्यांचे नवीन जी.पी.एफ. खात्यावर जमा करण्यात यावी, १९८९ पासूनच्या शिक्षकांना स्थायी केल्याचे आदेश द्यावे, आयकर २४ क्यु ची आॅनलाईन कार्यवाही सर्व पंचायत समितीने तात्काळ करण्याबाबत निर्देश देण्यात यावे. या समस्यांकडे जाणीवपूर्वक लक्ष देत समस्या सोडविण्याचे आश्वासन काटोलकर यांनी शिष्टमंडळास दिले.
यावेळी जिल्हाध्यक्ष लोमेश वऱ्हाडे, सरचिटणीस गजानन पुरी, कोषाध्यक्ष, जि.प.शिक्षण समितीचे सदस्य वसंत बोडखे, उपाध्यक्ष राजेश वालोकर, कृष्णा देवकर, कार्याध्यक्ष अनिल ठाकरे, बुद्धपाल कांबळे, प्रभाकर तुरक, अरुण झोटिंग, सुनिल पावडे, राजेंद्र सोमनकर, सुनील कोल्हे, प्रकाश किटे, संजय नहाते, मनोहर नरसिंगकर, राऊत आदींची उपस्थिती होती.(स्थानिक प्रतिनिधी)