नवा वैद्यकीय अधीक्षक द्या
By Admin | Updated: May 23, 2016 02:12 IST2016-05-23T02:12:44+5:302016-05-23T02:12:44+5:30
येथील ग्रामीण रुग्णालयात सध्या वैद्यकीय अधिकारी म्हणुन डॉ. बोडखे आहेत. दुसरे वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. खेळकर कार्यरत आहेत.

नवा वैद्यकीय अधीक्षक द्या
समुद्रपूर : येथील ग्रामीण रुग्णालयात सध्या वैद्यकीय अधिकारी म्हणुन डॉ. बोडखे आहेत. दुसरे वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. खेळकर कार्यरत आहेत. वैद्यकीय अधीक्षक असून त्यांची रुग्णालयात उपस्थिती नसल्यासारखीच असते.
याबाबत त्यांना विचारले असता जिल्हा सामान्य रुग्णालयात सर्जन नसल्याने चार दिवस वर्धेला राहावे लागते, असे सांगण्यात आले. रुग्णालयात मोठ्या मशनरी आहेत. पण नियोजन नसल्याने त्या धुळखात आहे.
या रुग्णालयात कार्यरत वैद्यकीय अधीक्षकाचे निलंबन करून त्वरीत दुसरे वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय अधीक्षक नेमण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी आ. समीर कुणावर यांच्याकडे केली आहे.
याकडे दुर्लक्ष झाल्यास शुक्रवारी केलेल्या आंदोलनापेक्षा अधिक तीव्र आंदोलन करू, असा इशारा नागरिकांनी दिला. यावेळी जाम येथील उपसरपंच सचिन गावंडे, समुद्रपूर नगरपंचायतचे सभापती गजानन राऊत, माजी ग्रा.पं. सदस्य अशोक डगवार, मनीष गांधी, रुग्ण कल्याण समितीचे राम कावळे, सुनील धाबेकर, मधुकर मडकाम, दीपक जवादे, बालू कोल्हे, गजानन चंदनखेडे, प्रदीप डगवार उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)