दोन हेक्टरपर्यंत शेतकऱ्यांना वाढीव मदत द्या
By Admin | Updated: March 19, 2015 01:47 IST2015-03-19T01:47:35+5:302015-03-19T01:47:35+5:30
केंद्र सरकारच्या निकषानुसार २ हेक्टरपर्यंत ५ एकरावरील शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय मराठवाडा विभागासाठी झाला; पण विदर्भाला यापासून वंचित ठेवण्यात आले़ ..

दोन हेक्टरपर्यंत शेतकऱ्यांना वाढीव मदत द्या
वर्धा : केंद्र सरकारच्या निकषानुसार २ हेक्टरपर्यंत ५ एकरावरील शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय मराठवाडा विभागासाठी झाला; पण विदर्भाला यापासून वंचित ठेवण्यात आले़ विदर्भातील शेतकऱ्यांनाही वाढीव मदत देण्यात यावी, अशी मागणी भाजप किसान मोर्चाने केली आहे़
विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद यांनी विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना याद्या तयार करण्याचे आदेश दिले़ मराठवाड्यात ल ३ लाख शेतकऱ्यांना ही मदत प्राप्त होणार आहे़ राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या निकषानुसार शेतकऱ्यांना २ हेक्टरची मर्यादा देणे आवश्यक आहे; पण मराठवाड्यातील शेतकऱ्याकरिता हा निर्णय झाला. विदर्भातील ५ लाख शेतकऱ्यांना हा निर्णय लागू नाही. विदर्भात सतत दुष्काळ व पैसेवारी ५० टक्केच्या आत असल्याने २ हेक्टरपर्यंत ५ एकरावरील शेतकऱ्यांना मदत दिली गेली. मराठवाड्याप्रमाणे विदर्भालाही २ हेक्टरची मदत देऊन त्यांच्यावरील अन्याय दूर करावा़ जिरायत क्षेत्रातील प्रती हेक्टरी ४ हजार ५०० बागायती क्षेत्रासाठी ९ हजार रुपये मदत जाहीर केली; पण विदर्भातील विहीर व सिंचन असलेल्या बागायती शेतकऱ्यांना हेक्टरी ४ हजार ५०० रुपये मदत दिली़ हा अन्याय विदर्भावरच झाला़ वैदर्भीय शेतकऱ्यांनाही २ हेक्टरची मदत व बागायती क्षेत्रासाठी ९ हजार हेक्टरी मदत देण्याची मागणीही किसान मोर्चाचे प्रशांत इंगळे तिगावकर यांनी निवेदनातून केली़(कार्यालय प्रतिनिधी)