शेतकऱ्यांना तुरीचे चुकारे त्वरित द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 00:16 IST2018-06-02T00:16:54+5:302018-06-02T00:16:54+5:30
नाफेडकडुन शेतकऱ्यांच्या खरेदी केल्याल्या तुरीचा चुकारा त्वरित देण्याच्या मागणीसह विविध मागण्याचे निवेदन राकाँच्यावतीने तहसीलदारांना सादर करण्यात आले आहे. निवेदनातून करण्यात आलेल्या मागण्यांवर येत्या काही दिवसात निर्णय न घेतल्या आंदोलनाचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

शेतकऱ्यांना तुरीचे चुकारे त्वरित द्या
लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : नाफेडकडुन शेतकऱ्यांच्या खरेदी केल्याल्या तुरीचा चुकारा त्वरित देण्याच्या मागणीसह विविध मागण्याचे निवेदन राकाँच्यावतीने तहसीलदारांना सादर करण्यात आले आहे. निवेदनातून करण्यात आलेल्या मागण्यांवर येत्या काही दिवसात निर्णय न घेतल्या आंदोलनाचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
फेबुरवारी महिण्या पासुन तालक्यातील १ हजार १३४ शेतकऱ्यांनी आपल्या १३ हजार ४५५ क्विंटल तूर शासनाच्या खरीददार नाफेडला विकल्या. मात्र, आतापर्यंत अवघ्या ५५ शेतकऱ्यांचे तुरीचे चुकारे त्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहे. १ हजार ७९ शेतकऱ्यांना तुरीच्या चुकाºयांची प्रतीक्षा आहे. इतकेच नव्हे तर ३ एप्रिलपासून सुरु झालेल्या नाफेडच्या चणा खरीदीमध्ये २६१ शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील ४ हजार ३८२ क्विटंल चणा विकाला आहे. परंतु, अद्यापही एकाही शेतकऱ्याला विकलेल्या चण्याची रक्कम देण्यात आली नाही. अवघ्या काही दिवसात जोरदार पाऊस झाल्यास शेतकरी पेरणीच्या कामाला गती देणार आहे. अशात बियाणे व खत खरेदीसाठी त्याच्याकडे पैसेच नसल्याने त्याला पुन्हा सावकाराच्या दारात उभे राहण्याची वेळ येणार आहे. शेतमाल विकला; पण हातात पैसा नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडीच झाली आहे. या आर्थिक कोंडीमुळे अनेक शेतकऱ्यांना शेतजमिन पडीक ठेवण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्यांच्या समस्या लक्षात घेता तात्काळ योग्य कार्यवाहीची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना माजी आमदार राजू तिमांडे, प्रदीप डगवार, मधुकर कामडी, आशीष अंड्रस्कर, रामभाऊ उमरे, सरीता लोहकर, सौरभ सावळे, वैभव खुरपडे, सौरभ थुल, हर्षल उमरे आदींची उपस्थिती होती.