होतकरू विद्यार्थ्यांना खासगी संस्थेत नि:शुल्क प्रवेश द्या

By Admin | Updated: June 12, 2016 01:56 IST2016-06-12T01:56:12+5:302016-06-12T01:56:12+5:30

शैक्षणीक संस्था राजकारणी लोकांचा अड्डा बनला आहे. यात गरीब विद्यार्थी गुणवत्ता असतानाही चांगल्या शिक्षणापासून वंचित राहत आहे.

Give budding students free access to private organizations | होतकरू विद्यार्थ्यांना खासगी संस्थेत नि:शुल्क प्रवेश द्या

होतकरू विद्यार्थ्यांना खासगी संस्थेत नि:शुल्क प्रवेश द्या

मागणी : सामाजिक संघटनांचे खासदारांना साकडे
देवळी : शैक्षणीक संस्था राजकारणी लोकांचा अड्डा बनला आहे. यात गरीब विद्यार्थी गुणवत्ता असतानाही चांगल्या शिक्षणापासून वंचित राहत आहे. पैशाअभावी या विद्यार्थ्यांचे खासगी संस्थेतील शिक्षण खंडित होऊ नये. खासगी संस्थेत दाखला घेताना ते पैश्याअभावी उपेक्षित राहू नये. यासाठी गरीब व होतकरू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे. हा खर्च शासनाने उचलावा, अशी मागणी सामाजिक संघटनांनी केली. याबाबत खा. रामदास तडस यांना निवेदनही दिले.
शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून या ठिकाणी शेतकऱ्यांसह सामान्यासंची परिस्थिती हलाखीची आहे. दरवर्षीचा दुष्काळ व नैसर्गिक आपत्तीमुळे त्याचे कंबरडे मोडले आहे. यामुळे आपल्या होतकरू व गुणवंत मुलांना चांगल्या संस्थेत प्रवेश देताना त्यांचे डोळे पांढरे होत आहे. या सर्व बाबींचा विचार करून शासनाने अशा विद्यार्थ्यांचे खासगी संस्थेमध्ये शैक्षणिक शुल्क माफ करून न्यायाची भूमिका घ्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
याप्रसंगी सामाजिक संघटनेचे प्रवीण फटिंग, गोपाल आचार्य, विलास खोपाळ, रवी झाडे, सागर वानखेडे, प्रणीत कुर्जेकार, आशीष सोनपितळे, प्रिन्स केने आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)

Web Title: Give budding students free access to private organizations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.