वर्धेतील युवतीला चंद्रपूर येथून फूस लावून पळविले
By Admin | Updated: September 27, 2014 23:20 IST2014-09-27T23:20:03+5:302014-09-27T23:20:03+5:30
शहरातील १६ वर्षीय युवतीस तिघांनी चंद्रपूर जिल्ह्यातील तिच्या नातलगांकडे असताना फूस लावून पळवून नेले़ याबाबत युवतीच्या वडिलांनी नागभीड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली़ शिवाय जिल्हा

वर्धेतील युवतीला चंद्रपूर येथून फूस लावून पळविले
वर्धा : शहरातील १६ वर्षीय युवतीस तिघांनी चंद्रपूर जिल्ह्यातील तिच्या नातलगांकडे असताना फूस लावून पळवून नेले़ याबाबत युवतीच्या वडिलांनी नागभीड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली़ शिवाय जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांना निवेदन सादर करीत कारवाईची मागणी केली आहे़
शहरातील अंजुमन चाळ, जैन मंदिरमागे दुर्गा टॉकीजजवळ राहणाऱ्या एका युवतीला चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथून फूस लावून पळवून नेले़ ही घटना १८ सप्टेंबर रोजी घडली़ याबाबत युवतीच्या वडिलांनी नागभीड पोलीस ठाण्यात शेख रोशन शेख गुलाब रा़ मुन्ना शेख यांच्या घरी अंजुमन चाळीसमोर वर्धा, सलमान आणि मजहर खान यांच्याविरूद्ध नागभीड पोलीस ठाण्यात २२ सप्टेंबर रोजी तक्रार दाखल केली़ यावरून भादंविच्या कलम ३६३, ३६६ अधिक ३४ अन्वये गुन्हाही नोंदविण्यात आला; पण अद्याप युवतीचा शोध लागला नाही़ सदर युवतीशी जवळीक साधण्याचा शेख रोशन शेख गुलाब याने प्रयत्न केला होता़ यामुळे तिच्या वडिलांनी तिला तळोदी येथे नातलगाकडे पाठविले होते़ पण शेख रोशनने तिच्याशी संपर्क साधून तिला आमिष दाखवीत पळवून नेले़ हा प्रकार लव्ह जिहादचा असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे़ पोलीस यंत्रणेने युवतीचा शोध लावावा, अशी मागणी तिच्या वडिलांनी केली आहे़(कार्यालय प्रतिनिधी)