गिरड व साखरबाऊली दर्गावर उर्स सुरु
By Admin | Updated: October 5, 2016 01:50 IST2016-10-05T01:50:46+5:302016-10-05T01:50:46+5:30
येथील विदर्भ प्रसिद्ध शेख फरीदबाबा दर्गाह टेकडी आणि दर्गाह हजरत बाबा शेख फरीद साखरबाऊली येथे ऊर्सला प्रारंभ झाला आहे.

गिरड व साखरबाऊली दर्गावर उर्स सुरु
भाविकांची गर्दी : मोहरमनिमित्त विविध कार्यक्रमांनाही प्रारंभ
गिरड : येथील विदर्भ प्रसिद्ध शेख फरीदबाबा दर्गाह टेकडी आणि दर्गाह हजरत बाबा शेख फरीद साखरबाऊली येथे ऊर्सला प्रारंभ झाला आहे. सोमवारपासून मोहरमनिमित्त विविध कार्यक्रमांनाही प्रारंभ झाला आहे. यामुळे भाविकांचीही गर्दी वाढत आहे.
मोहरमच्या तयारीकरिता दर्गाह टेकडी आणि हजरत शेख फरीद साखरबाऊली दर्गाह पूर्णत: विद्युत रोषणाईने सजविण्यात आला आहे. यावेळी साखरबाऊली दर्गाह व बाबा शेख फरीद या दोन्ही ठिकाणी उर्स साजरा करण्यात येत आहे. शुक्रवारी दुपारी ३ वाजता साखरबाऊली येथून शाही संदल काढण्यात येणार आहे. हा शाही संदल गिरड गावाचे भ्रमण करून सायंकाळी ६ वाजता दर्गाह टेकडीवर पोहोचेल. यावेळी टेकडीवर सायकांळी ६.३० वाजता शाही लंगरचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री ९ वाजता टेकडीवर ‘शमा ए मैफिले’ कार्यकम आयोजित आहे. रात्री ३ वाजता गुसलचा कार्यकम आहे. शनिवारी सकाळी ७ वाजता ध्वजारोहण करण्यात येणार आहे. उर्सकरिता बाहर गावाहून येणाऱ्या भाािकांची योग्य व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन शेख बाबा फरीद दर्गाह टेकडीचे अध्यक्ष शमसुद्दीन काजी, माजी अध्यक्ष करीमुद्दीन काजी, आरीउदीन काजी, साखरबाऊली दर्गाहचे अध्यक्ष जहीर काजी, कोषाध्यक्ष शेख शकिल शेख नादीर, शेख रफिक आदींनी केले आहे.(वार्ताहर)